रविवार १ नोव्हेंबर रोजी मनपातर्फे एक तास एक साथ अभियान

रविवार १ नोव्हेंबर रोजी मनपातर्फे एक तास एक साथ अभियान
क्विझ कॉन्टेस्टद्वारे आकर्षक बक्षिसे

चंद्रपूर २९ सप्टेंबर – केंद्र शासनाच्या निर्देशानुसार  स्वच्छता पंधरवाडा अंतर्गत स्वच्छतेसाठी श्रमदान अभियान १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ” एक तास एक साथ” या थीमवर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे राबविले जाणार असून याअंतर्गत स्वच्छता श्रमदान केले जाणार आहे. यासाठी शहराच्या १७ प्रभागात विभिन्न चमुद्वारे ठराविक ठिकाणी नागरीकांच्या मदतीने सार्वजनिक जागा स्वच्छ केल्या जाणार आहेत.
याप्रसंगी स्वच्छतेबरोबरच, वृक्षलागवड, पेन्टींग करण्यात येणार असुन क्विझ कॉन्टेस्ट सुद्धा घेण्यात येऊन विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.शहरातील तुकूमगेट,वडगाव,,शास्त्रीनगर, विवेक नगर,एम.ई.एल,बंगाली कॅम्प,इंडस्ट्रीयल इस्टेट,बाबुपेठ,जटपुरा नगिनाबाग,एकोरी मंदिरमी भानापेठ, विठ्ठल मंदिर,महाकाली प्रभाग,भिवापुर,लालपेठ कॉलरी इत्यादी परीसरात मनपाचे अधिकारी कर्मचारी यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत परिसरातील नागरीकांच्या सहभागाने एक तास श्रमदान केले जाणार आहे.
    राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस “स्वच्छ भारत दिवस” म्हणून साजरा केला जातो. यावर्षी “स्वच्छ भारत दिवस २०२३” च्या निमित्ताने १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत “स्वच्छता ही सेवा” हा उपक्रम स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व शहरी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार असून, दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी देशभरात प्रत्येक गावात,शहरात व्यापक स्वरूपात “एक तारीख- एक तास” स्वच्छतेसाठी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत रविवार दि. १ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता एकत्रितपणे एक तास करावयाच्या स्वच्छतेसाठी श्रमदान उपक्रमामध्ये नागरिकांना सहभागी होण्यासाठी मनपाद्वारे दिल्या गेलेल्या ठिकाणी नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने सहभागी होण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.