जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न प्रलंबित प्रकरणांना गती दयावी– जिल्हाधिकारी
भंडारा दि. 28 : अनुसूचीत जाती/ जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अंतर्गत प्रलंबित प्रकरणाना गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयल येथील सभागृहात आयोजीत बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी समिर कुर्तकोटी, सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख, जिल्हा शल्य चिकीत्सक दिपचंद सोयाम, पोलीस विभागाचे अधिकारी व आदी अधिकारी उपस्थित होते.
गेल्या बैठकीतील इतीवृत्ताची माहिती सहायक आयुक्त श्री.देशमुख यांनी यावेळी दिली. सन 2022-23 व 2023-24 या दोन वर्षाचे 10 प्रकरणे प्रलंबित असुन त्यापैकी 3 प्रकरणात दोषारोप अहवाल न्यायालयात सादर करण्यात आले असून एका प्रकरणात केस क्रमांक प्राप्त होणे बाकी असून उर्वरीत सहा प्रकरणे पोलीस तपासावर असल्याने प्रलंबित असल्याचे सहायक आयुक्तांनी सांगितले. तालुक्यावर दक्षता व नियंत्रण समितीच्या नियमीत बैठका होत असल्याची माहिती त्यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.