3 ऑक्टोबर रोजी भंडारा येथे लोकशाही दिन
भंडारा,दि.27 : जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी व तालुकास्तरावर लोकशाही दिन राबविण्यात येतो. परंतु 2 ऑक्टोबर,2023 रोजी महात्मा गांधी जयंती असल्यामुळे तसेच शासकीय सुट्टी असल्याने लगतच्या दिवशी लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार दि. 3 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 1.00 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
लोकशाही दिनाच्या तक्रारीचे निकष याप्रमाणे आहेत. अर्ज विहित नमुन्यात असावा. तक्रार अर्ज दोन प्रतीत सादर करावा. तक्रार व निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती न जोडलेला अर्ज, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी तसेच तक्रार व निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर अर्ज स्विकारले जाणार नाहीत.असे निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके यांनी कळवले आहे.