ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा
चंद्रपूर, दि.25: अचलपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा “दिव्यांग कल्याण मंत्रालय दिव्यांगाच्या दारी” अभियानाचे अध्यक्ष,ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू (मंत्री दर्जा)
हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार, दि. 26 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन. सकाळी 10:30 वाजता विद्यानिकेतन शाळेसमोरील(नागपूर रोड), शकुंतला लॉन्स(फार्म) येथे दिव्यांग अभियान कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 4 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे राखीव व बैठक. सायंकाळी 5 वाजता माता महाकालीचे दर्शन घेतील व सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह, गडचिरोलीकडे रवाना होतील.