शासकीय धान्य गोदामातील अन्नधान्याच्या हाताळणुकीसाठी हमाल संस्थेच्या नेमणुकीकरीता निविदा आमंत्रित

शासकीय धान्य गोदामातील अन्नधान्याच्या हाताळणुकीसाठी हमाल संस्थेच्या नेमणुकीकरीता निविदा आमंत्रित

चंद्रपूर, दि. 25 : राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशान्वये व जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडून जिल्ह्यात नोंदणीकृत हमाल कामगार सहकारी संस्थांकडून सन 2023 ते 2026 या कालावधीकरीता जिल्ह्यातील 25 शासकीय गोदामातील अन्नधान्य, साखर, तुरडाळ, भरडधान्य व इतर वस्तू हाताळणुकीसाठी हमाल संस्थेची नेमणूक करण्यात येत आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग,मुंबई यांच्या दि. 06 मार्च 2023 च्या शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार नव्याने हमाल कंत्राट निश्चित करण्यासाठी खुली ई-निविदा ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात आल्या होत्या. परंतु, या ई-निविदा प्रक्रियेमध्ये फक्त एकच निविदा प्राप्त झाल्याने फेर ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सदर निविदेचा निविदा फॉर्म,अटी व शर्ती तसेच सविस्तर माहिती http://www.mahatenders.gov.in व www.chanda.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. फेर ई-निविदा दि. 6 ऑक्टोंबर 2023 रोजी दुपारी 5 वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने भरता येईल. याची नोंद घ्यावी, असे जिल्हा पुरवठा अधिकारी अजय चरडे यांनी कळविले आहे.