केंद्र शासन पुरस्कृत मिशन शक्ती या योजनेतील सामर्थ्य या उपाय योजनेंतर्गत सखी निवास घटक योजनाअंतर्गत प्रस्ताव सादर करावेत

केंद्र शासन पुरस्कृत मिशन शक्ती या योजनेतील सामर्थ्य
या उपाय योजनेंतर्गत सखी निवास घटक योजनाअंतर्गत प्रस्ताव सादर करावेत

गडचिरोली, दि.20: नोकरी करणाऱ्या महिलांना नोकरीच्या ठिकाणी सुरक्षित आणि सोईस्कर पद्धतीने निवासाच्या व्यवस्थे करिता केंद्र शासनाच्या दिनांक 14 जुलै २०२२ रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मिशन शक्ती अंतर्गत सबल आणी सामर्थ्य या दोन योजना राबविण्यात येत आहेत. सदर योजनेतील सामर्थ्य या उपाययोजनेत नोकरी करणाऱ्या महिलांच्या वस्तीगृहाव्यतिरिक्त सखी निवास कार्यान्वित करायचे आहेत.
जिल्हातील नोकरी करणाऱ्या महिलांना नोकरीच्या शहरामध्ये सुरक्षीत आणि सोईस्कर निवासाची व्यवस्था होण्यासाठी गडचिरोली जिल्हास्तरावर-1 (एक) भाडेतत्वावरील इमारतीमध्ये सखी निवास कार्यान्वीत करण्यासाठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या संस्था एजन्सी कडुन विहित पध्दतीने प्रस्ताव मागविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गतचे प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक असलेली सविस्तर माहिती ज्यात केंद्र शासनाचे दिनांक 14 जुलै २०२२ रोजी मिशन शक्ती या एकछत्रीत योजनेचे मार्गदर्शक सूचना प्रस्ताव सादर करावयाच्या अर्जाचा नमुना अर्ज सादर करण्याची सर्वसाधारण पद्धत, संस्था/एजन्सीच्या पात्रतेचे निकष, सखी निवासासाठी आवश्यक असलेली इमारत व भौतीक सोईसुविधा अनुदान, कर्मचारी वर्ग, शासन निर्णय इ. सर्व सविस्तर माहिती या आयुक्तालयाच्या hrttps/www.wcdcommpune.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये केंद्र शासन पुरस्कृत सखी निवास योजना कार्यावित करून ती केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना व राज्य शासनाचे शासन निर्णय व या संबंधीचे वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या सुचनेनुसार सदरची योजना राबविण्यास इच्छुक असलेल्या संस्था/एजन्सीजकडुन परिपुर्ण प्रस्ताव 4 प्रतित दिनांक ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा महिला बाल विकास कार्यालय, गडचिरोली बॅरेक क्र. 26 व 27. कलेक्टर कॉम्पलेक्स येथे सादर करण्यात यावे. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.