स्पर्धा परीक्षेतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडतो:-डॉ. सचिन मडावी
आदिवासी विकास परिषद सिंदेवाही तालुक्याच्या वतीने पंचायत समिती सभागृह येथे आदिवासी सामाजिक मेळावा तथा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आलेले होते . या कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ सचिन मडावी उप आयुक्त समाज कल्याण यावेळी म्हटले की. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता स्पर्धा परीक्षा फार महत्त्वाची भूमिका बजावत असून स्वतःची क्षमता निर्माण करण्यासाठी प्रेरणा स्पर्धा परीक्षेतून निर्माण होतो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ही तुम्ही सकारात्मक कल्पना करून शकता असेल तर आणि त्याचा आनंद घेऊ शकता असाल तर तुमचे भविष्य उज्वल आहे सकारात्मक पुस्तक वाचा त्यांना जीवनात उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा असे प्रतिपादन याप्रसंगी त्यांनी केले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमोद बोरीकर विदर्भ महासचिव आदिवासी विकास परिषद होते . डॉ रोहन कुमरे अपघात विभाग ग्रामीण रुग्णालय गडचिरोली . दामोदर वाढवे ज्येष्ठ आदिवासी सेवक प्रा डॉ स्नेहा वेलादी शिंदेवाही . प्रा डॉ प्रकाश शेडमाके भौतिकशास्त्र चे डीन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यूनिवर्सिटी नागपूर. यशवंत ताडाम माजी जिल्हा परिषद सदस्य. नथुजी मडावी वसंतराव शिडाम निकीता मेश्राम अध्यक्ष राणी हिराई महिला बचत गट सिंदेवाही सुभाष कोलते पोलीस पाटील पळसगाव जाट विजय सोयम तालुकाध्यक्ष यांची उपस्थिती होती . आशिष संहारे कार्यक्रमाचे आयोजन कैलास कुमरे जिल्हा संपर्कप्रमुख आदिवासी विकास परिषद यांनी केले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मार्गदर्शन करताना प्रमोदजी बोरीकर म्हटले की समाजामध्ये एकता निर्माण करण्याकरिता युवा पिढीने पुढे यावे आज संघटित झाल्याशिवाय सामाजिक समस्या सुटणार नाही फक्त नेतृत्व करणारे प्रतिनिधी शोधले पाहिजेत फक्त व्यासपीठावर लंब्या गोष्टी करणाऱ्या कडे लक्ष वेधू नये असे प्रतिपादन यावेळी यांनी केले . दामोदर वाढवे यांनी म्हटले की मी स्वतः नारायणसिह उईके. विश्वेशराव महाराज बाबुरावजी मडावी नेताजी राजगडकर सुखदेव उईके यांच्या चळवळीमध्ये सक्रिय सहभागी होतो त्यांचा कार्य हा समाजाकरिता सुवर्णकाळ होता अनेक प्रश्न त्यांनी सोडविले त्यामुळेच आज समाजात थोडीफार प्रगती दिसते आपण आज गटागटात विभागले असल्यामुळे आपल्यावर अनेक रोज अन्यायकारक जीआर येत आहेत प्रशासन व शासन आदिवासींचे हितशत्रू यांचा मुकाबला करण्यासाठी पुन्हा एकदा आजच्या युवा पिढीने आपलं सामाजिक कर्तव्यदक्ष नेत्यांचे कार्य पुढे करून समोर यावे असे प्रतिपादन केले
डॉ स्नेहा वेलादी यांनी म्हटले की. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात प्रयत्न करा तर शिखरावर आपण पोहोचू शकता आपला समाज एकाकडे वैभवशाली होता ती वैभवशालता निर्माण करण्याकरिता शिक्षण महत्वाचे आहे असे प्रतिपादन . प्रा डॉ प्रकाश शेडमाके यांनी म्हटले की कोणतेही समस्या विद्यार्थ्यांचे असू द्या मला केव्हाही व कोणत्याही क्षणी फोन करा मी तत्काळ आपल्या सेवेकरिता हजर राहील व आपल्या समस्या सोडवण्याकरिता प्रयत्न करणार असे जाहीर आवाहन केले याप्रसंगी यांनी केले. कु प्रिया ताडाम.मुकेश गेडाम. अक्षय उईके यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला भानापूर मेंढा सावली ग्रामीण क्षेत्रातील मुलगी चंद्रपूर जिल्ह्यातून आदिवासी समाजातील महाराष्ट्रातील प्रथमच प्रिया यशवंत ताडाम समुद्रा पार भरारी केली. उच्च शिक्षणाकरिता क्यून मेरी विद्यापीठात लंडन येथे एलएलबी करिता निवड झाली. परिषद जिल्हा परिषद शाळा आसोला चक सावली तालुक्यातील असून. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर च्या विद्यापीठांमध्ये एलएलबी चे शिक्षण केले त्याच लंडन विद्यापीठात प्रिया यशवंत ताडाम यांची निवड झाली हे बाब समस्त आदिवासी समाजाकरिता अभिमान पात्र आहे अक्षय उईके या तरुण उद्योगास दिल्लीच्या सात पर्यंत सोड्यात सहभागी होण्याचे निमंत्रण मिळाले चंद्रपूर जिल्ह्यातील लागवड येथील वन उपजा पासून विविध पदार्थ बनवून त्याची विक्री करणे जवळपास 300 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिले बनवलेले हे पदार्थ आरोग्यासाठी हित वाहक असून आजारपणावर गुणकारी आहेत शासनाकडून आयोजित केलेल्या विविध ठिकाणी प्रदर्शनामध्ये सहभागी झालेले असतात भारत सरकार या उपक्रमाची दखल घेतली असून दिल्ली मंत्रालय भारत सरकार सूक्ष्म लहू उद्योग माध्यम या विभागाने स्वातंत्र्य दिनानिमित्त सहभागी होण्याकरिता निमंत्रण दिले होते आदिवासी समाज जंगलव्यापी असून समाजामध्ये अनेक सुशिक्षित बेरोजगार बहुसंख्येने आहेत अक्षय उईके यांच्या कार्याची माहिती समाजाकरिता भावी व त्यातून समाजाच्या युवा तरुण पिढीला एक नवीन स्वयं आधार मिळावा याकरिता अक्षय उईके यांचे सत्कार करण्याचं परिषदेने ठरविले .मुकेश गेडाम तिची निवड सदस्य म्हणून महाराष्ट्र शासन रंगभूमी परी निरीक्षण मंडळ मुंबई येथे झाले सदर परिसर झाडीपट्टी असल्यामुळे या परिसरातील बहुसंख्य आदिवासी समाजातील नवयुवक जेष्ठ कलावंत या क्षेत्रातील जोडलेले आहेत तीनही तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचा पण सत्कार करण्यात येत आहे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणादायक वातावरण निर्माण होईल. सिंदेवाही येथे कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास कुमरे जिल्हा संपर्कप्रमुख आदिवासी विकास परिषद यांनी केले आहे. संचलन रमेश शिडाम ओमकार कोवे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाकरिता विशेष परिश्रम कृष्णा मडावी . बालकृष्ण गेडाम से नी वनपाल मकरंद मडावी चेतन तुमराम. अंकुश शिडाम. ज्योती मडावी वर्षा नंदलाल मसराम. दिव्यानी मडावी माणिक पेदाम अरविंद शिडाम गणेश पेंदाम भालचंद्र सोयाम. संजू ताई पेंदाम. चंद्रकला सोयाम यांनी विशेष परिश्रम घेऊन सामाजिक दिशादर्शक सत्कार कार्यक्रमा ला परिश्रम केले.