वाहनाची व वाहनचालकांच्या कागदपत्राची तपासणी मोहिम

वाहनाची व वाहनचालकांच्या कागदपत्राची तपासणी मोहिम

           भंडारा, दि. 12 :  भंडारा जिल्ह्यातील व ग्रामीण भागातील गणेश उत्सव  25 सप्टेबर ते  3 ऑक्टोबर 2023 पर्यत गणेश मूर्तीचे विसर्जन होत असल्यामुळे मिरवणूकीमध्ये वापरण्यात येणाऱ्या वाहनांची तसेच वाहन चालकांच्य कागदपत्राची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच तपासणी करुन यांची माहिती पोलिस निरीक्षक, पोलिस स्टेशन येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती  उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने कळविण्यात आली आहे.