विशेष वृत्तमधकेंद्र योजनेसाठी अर्ज आमंत्रित
तेरा लाभार्थ्याना समितीची मंजूरी
भंडारा, दि.12 : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधकेंद्र योजना जिल्हयात राबविण्यात येत असून काल जिल्हाधिकारी श्री.योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली मधपाळ निवडी बाबत सभा संपन्न झाली .असता या सभेला वन विभाग उपवन संरक्षक राहुल गवई, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संगीता माने, महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र श्री.बदर खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्री.देवीपुत्र व मध उद्योग तांत्रिक कर्मचारी उपस्थित होते .
मधकेंद्र योजनेतंर्गत १३ लाभार्थीचे अर्ज प्राप्त झाले होते. कालच्या बैठकीत जिल्हा समितीने १३ लाभार्थीना मधपेटया व इतर साहित्यासाठी लाभार्थीला मान्यता दिली आहे. मधकेंद्र योजनेमुळे शेतक-यांना लाभ होणार असून मधमाशामुळे शेतीपीकात होणाऱ्या परागीकरणामुळे ३५ ते ४० टक्के शेती उत्पादनात वाढ होते. शेती उत्पादनाबरोबर मध, मेण, पराग, रॉयल जेलीचे ही उत्पादन घेता येत असल्याने मधमाशापालन उद्योग शेतक-यांना फायदेशीर आहे.
तरी जिल्हयातील फळबाग, फुल शेती, भाजीपाला व इतर मधउद्योगाची आवड असणा-या शेतक-यांनी राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश् कुंभेजकर यांनी केले आहे.
काय आहे मधकेंद्र योजना-योजनेची वैशिष्टे- मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात ५० टक्के अनुदान व ५० टक्के स्वगुंतवणुक, शासनाच्या हमी भावाने मधखरेदी, विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनाची जनजागृती योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता वैयक्तीक मधपाळ पात्रता : अर्जदार साक्षर असावा स्वतःची शेती असल्यास प्राधान्य,वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे,
केंद्रचालक प्रगतिशील मधपाळ पात्रता किमान १० वी पास, वय २१ वर्षापेक्षा जास्त ,अश्या
व्यक्तींच्या नावे किमान १ एकर किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नांवे किमान १ एकर शेत जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन व लाभार्थीकडे मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.
केंद्रचालक संस्था पात्रता : संस्था नोंदणीकृत असावी संस्थेच्या नांवे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान १००० चौ. फुट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादणा बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असावी.
अटी व शर्ती- लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापुर्वी मध व्यवसाय सुरू करणेसंबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य राहिल, मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, भंडारा जांभुळकर निवास मस्तानशाह दरगाहासमोर भंडारा येथे श्री. आसोलकार ,मधुक्षेत्रिक मो नं. ९४२११११६६५- व श्री. देविपुत्र जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०७१८४- २५२५२१/९९२१५९१५३२ वर संपर्क करता येईल.