पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5 वी) व
पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.8 वी) फेब्रुवारी 2024 ची अधिसुचना
गडचिरोली, दि.07: पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5वी) व पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.8 वी) दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परिक्षेचे वेळापत्रक व परिक्षेच्या सविस्तर माहितीसह अधिसूचना परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
शासनमान्य शाळामधून सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षामध्ये प्रविष्ठ होण्यासाठी तसेच इयत्ता 8 वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परिक्षेत प्रविष्ठ होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदन पत्र परिक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in / या परिषदेच्या संकेतस्थळावर दिनांक 01 सप्टेंबर 2023 रोजी पासून उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
शाळा माहिती प्रपत्र, आवेदनपत्र व शुल्क ऑनलाईन भरणे- नियमित शुल्कासह 01 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2023, विलंब शुल्कासह 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2023, अती विलंब शुल्कासह 16 डिसेंबर ते 23 डिसेंबर 2023, अती विशेष विलंब शुल्कासह 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2023 आहे. असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.