नियमित मालमत्ता कर भरणा करणाऱ्याकरिता प्रोत्साहन योजना

मालमत्ता करात १० टक्के तर पाणी करात ५ टक्के सुट
नियमित मालमत्ता कर भरणा करणाऱ्याकरिता प्रोत्साहन योजना

चंद्रपूर ५ सप्टेंबर –  चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांसाठी मनपाद्वारे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असुन नियमित मालमत्ता कर व पाणी कराचा भरणा करणाऱ्यांकरीता प्रोत्साहन योजना जाहीर करण्यात आली आहे. यानुसार ३० सप्टेंबरपर्यंत मालमत्ता कराचा एकमुस्त भरणा केल्यास चालू आर्थिक वर्षासाठी मालमत्ता करात १०% सुट तर १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबरपर्यंत पाणी कराचा एकमुस्त भरणा केल्यास चालू आर्थिक वर्षासाठी ५ टक्के सूट देण्यात येणार आहे.परंतु सदर सुट ही औद्योगीक मालमत्तेस लागु राहणार नाही.
मालमत्ता कर हे मनपाच्या उत्पन्नाच्या प्रमुख स्रोतांपैकी एक आहे. शहरासाठी नियमित सोयी सुविधा पुरविण्यास मालमत्ता कराची अधिकाधिक वसुली होणे गरजेचे आहे. महापालिका क्षेत्रात जवळपास ८० हजार मालमत्ता असून, संपूर्ण मालमत्तांच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे मागणी नोंदवली जाते. करदात्यांना कराची नोटीस पाठवून कर भरणा करण्यासाठी विनंती करणे ही कर विभागाची पहिली प्रक्रिया मानली जाते. जास्तीत जास्त वसुली होऊन ती शहराच्या विकास कामांसाठी उपयोगी यावी या अनुषंगाने यंत्रणा जोमात कामाला लागली आहे.
www.cmcchandrapur.com या लिंकवर Pay Water Tax Online या टॅबवर पाणीपट्टी कराचा तर  https://chandrapurmc.org या लिंकवर मालमत्ता कराचा ऑनलाईन भरणा करता येणे शक्य आहे त्याचप्रमाणे फोन पे, गुगल पे,भीम या युपीआय ॲपवर सुद्धा मालमता व पाणी कराचा भरणा करता येणे शक्य आहे.मनपाच्या झोन कार्यालयांमध्ये प्रत्यक्षरीत्या कराचा भरणा करता येईल. त्यामुळे एकुण मालमत्ता करत सदर सुट देण्यात येत असल्याने मालमत्ता कर व पाणी कर त्वरित भरण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.