आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बालविवाह न करण्याची शपथ घेतली
जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी महिला व बाल विकास विभाग
व जिल्हा प्रशासनाच्या वतीने जणजागृती कार्यक्रम
गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथील जवाहरलाल नेहरू विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय जोगीसाखरा येथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी बालविवाह करणार नसल्याची शपथ घेतली. तसेच बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अन्वये मुलीच्या लग्नाचे योग्य वय 18 वर्ष व मुलाचे 21 वर्ष पूर्ण असून याचि आम्हाला जाणीव आहे. वय पूर्ण झाल्याशिवाय आम्ही विवाह करणार नाही आम्ही आमच्या गावात तसेच कुटुंबात बालविवाह होऊ देणार नाही तसेच बालविवाहच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नाही याविषयी सर्व विद्यार्थी शपथ घेतली.
दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोज मंगळवारला जिल्हा बाल संरक्षण कक्ष गडचिरोली येथील सामाजिक कार्यकर्ता जयंत जथाडे यांनी जवाहरलाल नेहरू विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय येथे शिकत असलेल्या वर्ग 8 ते 12 च्या एकूण 130 विद्यार्थ्यांना बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 व लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 या कायद्याविषयी व होणाऱ्या शिक्षेबाबत माहिती तसेच बालविवाह न करण्याची शपथ देऊन बालविवाहाचे दुष्परिणाम, बालविवाहमुळे लवकर मातृत्व लादले जाते आई होण्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी असणे महत्त्वाचे आहे तथापी मुलींच्या लवकर लग्नामुळे त्या लवकर आई होतात त्यामुळे मुलं व आई चे जीव धोक्यात येते प्रसंगी आई बाळाचा मृत्यु होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विवाह करणाऱ्या मुलांसाठी 21 वर्ष तर मुलींसाठी 18 वर्ष पूर्ण ही वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीनाही शिक्षा केली जाते याविषयी जयंत जथाडे यांनी मार्गदर्शन केले.
सदर उपक्रम जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले यांच्यां मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्रीकृष्ण खरकाटे ,प्रमुख पाहुणे प्रकाश पोहनकर, गिरीधारी रहेजा, इंद्रजित डोके, संतोष हटवार, देवीदास नैताम, श्रावण राऊत, प्रेमानंद मेश्राम, यशवंत मरापे तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे संचालन यशवंत पोहनकर तर आभार प्रेमानंद मेश्राम यांनी मानले.