स्वतःचे पुतनीवर बलात्कार करुन जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस (मावस काका) 20 वर्ष सश्रम कारावास व 1,75,000/- रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.
• गडचिरोली येथील मा. अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्री. उत्तम एम. मुधोळकर यांचा न्यायनिर्णय
सविस्तर वृत्त असे आहे कि, दिनांक 06/10/2019 रोजी पिडीता, वय 15 वर्ष ही आपले आई- वडिलाच्या गावावरुन दसरा सणानिमित्य पिडीतेची मावशी रा. भामरागड हिचेकडे गेली होती. पिडीतेचे मावशीचे घरी आरोपी नामे दल्लू मडावी ( मावस काका), वय 29 वर्ष तसेच त्यांची मोठी मुलगी – 3 वर्ष, मुलगा – 01 वर्ष, आणि पिडीता ही हजर होती.
दिनांक 11/10/2019 रोजी सकाळी 09.00 वा. पिडीतेची मावशी ही जि. प. प्रा. शाळा झारेवाडा येथे शिक्षीका असल्याने मुलाला घेऊन शाळेत गेली तेव्हा पिडीता ही घरी एकटीच होती. आरोपीची मुलगी ही दुपारी झोपी गेल्यानंतर आरोपी याने जेवन वाढुन मागीतले व पिडीता ही पलंगावर बसुन टि. व्ही. बघत असतांना आरोपी जेवन झाल्यानंतर तिच्याजवळ येवुन तुला एक गोष्ट सांगतो असे म्हणुन पिडीतेला जवळ घेऊन तिच्या तोंडाला ओढणी बांधुन पिडीतेवर जबरी संभोग केला व झालेल्या घटनेबाबत कोणालाही सांगीतले तर तुला मारुन टाकतो अशी धमकी दिली. तसेच घडलेली घटना पिडीतेनी आई- वडिल व मावशी हिला सांगीतले. पिडीतेच्या आई- वडील यांना माहीती कडताच पिडीतेला घेऊन आरोपी यांचे विरुध्द पोस्टे भामरागड येथे येवून वरीलप्रमाणे घडलेली घटनेची तोंडी रिपोर्ट दिल्यावरुन अप क्र. 35/2019 कलम 376 (3), 506 भादवी, अन्वये गुन्हा नोंद केला व दिनांक 12/10/2019 रोजी आरोपी याला अटक करण्यात आली.
सदर घटनेची पोलीस यंत्रणेने कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी विरुध्द सबळ पुरावा मिळून आल्याने मा. न्यायालयात दोषारोप दाखल केले असता से.के.क्र. 75/2019 अन्वये मा. सत्र न्यायालयात खटला चालवुन आज दिनांक 28/08/2023 रोजी मा. अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्री. उत्तम एम. मुधोळकर सरकारी पक्षाचा युक्तीवाद व साक्षदारांचे बयान ग्राहय धरुन कलम 376 (3), 506 भादवी सह कलम 4 बाल लै. अ. प्रति. कायदा अन्वये 20 वर्ष सश्रम कारावास व 1,75,000/- रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली व दंडाची रक्कम ही पिडीतेला पुर्नवसन व वैद्यकीय उपचाराकरीता देण्याचा आदेश करण्यात आला.
सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल एस. प्रधान यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्हाचा तपास पोउपनि / सुरज सुसतकर, पोलीस स्टेशन भामरागड यांनी केले तसेच संबधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी खटल्याच्या कामकाजात योग्य भुमीका पार पाडली.