भंडारा जिल्ह्यात उच्च दाब ॲल्युमिनीयम तार चोरी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथील २ आरोपींना अटक
-:स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा भंडारा ची कारवाई :- प्रकरण असे की, दिनांक २७/०८/२०२३ रोजी पो. नि. नितीनकुमार चिंचोळकर, पो. हवा. प्रदीप डाहारे, पो. हवा. कैलास पटोले, पो.हवा. किशोर मेश्राम, lपो.अ. सचिन देशमुख, पो. अं. कृणाल कडव, चापोना. आशिष तिवाडे हे अउघड गुन्हे, मोटरसायकल चोरीचे गुन्हयातील आरोपीतांचा शोधसाठी पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय खबर प्राप्त झाली, दोन इसम मोटार सायकलने उच्च दाब ॲल्युमिनीयम तार चोरी करून घेवून जात आहेत, अशा खबरेवर वरील पथक पवनी ते भुयार रोडवर परिसरात खबरेची शहानिशा करणेकामी गेले असता तेथे आरोपी १) विशाल ललीदास दिघोरे वय २६, धंदा शेती २) विनोद पांडुरंग दिघोरे वय ३३ वर्ष, धंदा शेती दोन्ही रा. नान्होरी ता. ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपुर या दोघांकडून १) अंदाजे १२०० किलो ३३ केव्ही उच्च दाब अॅल्युमिनीयम तार, किंमती २,७५,०००/- रूपये, २) एक हिरो कंपनीची पॅशन एक्सप्रो मो.सा. कमांक MH-34-AZ – 5669 किंमती ३५,०००/-रु. सोबत ताब्यात घेवून त्यांना सखोल विचारपुस केली असता त्यांनी पवनीपोलीस स्टेशन हद्दीत गुन्हा केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यावरून वर नमुद मुद्देमाल एकुण २,७५,०००/- रू चा जप्ती कारवाई करून पुढील तपासकरिता पोलीस स्टेशन पवनी यांचे ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पो. नि. नितीनकुमार चिंचोळकर, पो. हवा. प्रदीप डाहारे, पो. हवा. कैलास पटोले, पो. हवा. किशोर मेश्राम, पो.अ. सचिन देशमुख, पो. अं. कृणाल कडव, चापोना. आशिष तिवाडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांनी केलेली आहे