आत्मनिर्भर निर्भर अभियान अंतर्गत कृषी पायाभूत निधी योजना
“AIF लाभार्थी जोडणी अभियान पंधरवाडा” दि.१६ ते ३१ ऑगस्ट २०२३
गडचिरोली, दि.25:दिनांक २२ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्हा अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट/कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा तसेच कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने” कृषी पायाभूत निधी योजना “AIF लाभार्थी जोडणी अभियान पंधरवडा” निमित्त पंचायत समिती सभागृह, तालुका मूलचेरा जि. गडचिरोली येथे दुपारी 1.00 वाजता” कार्यक्रम पार पडला, कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले युवराज टेभूर्णे, LDM जिल्हा अग्रणी बँक गडचिरोली यांनी शेतकऱ्यांना बँक लोन पद्धत व त्यासंबंधी येणाऱ्या अडचणी व शंका निरसन केले. कार्यक्रमाचे उद्धघाटक म्हणून लाभलेले पी.एन. डाखळे यांनी तालुक्यामध्ये स्मार्ट प्रकल्पांतर्गत शेतकरी उत्पादन कंपन्यांच्या सध्या चालू असलेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन नंतर प्रकल्प तयार करावे मोठ्या प्रकल्पना कर्ज घेतले असल्यास केंद्र शासनाच्या अॅग्रिकल्चर इन्फ्रा फंड (AIF) योजनेमधील विविध व्यवसाय सुरू करून लाभ घेण्याविषयी आवाहन केले सर्व शेतकऱ्यांना तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एकत्र येऊन एकजुटीने काम करावे हे सांगितले. नाबार्ड बँकेचे जिल्हा व्यवस्थपक नारायण पौनीकर, यांनी नाबार्ड अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली व शेतकरी उत्पादक कंपनी ही समोर कशी वाढेल त्यामध्ये कोणत्या योजनेचा लाभ घेता येईल याविषयी मार्गदर्शन केले
तसेच स्मार्ट प्रकल्पाच्या नोडल अधिकारी श्रीमती अर्चना राऊत- कोचरे यांनी स्मार्ट प्रकल्प अंतर्गत मुल्यसाखळी वाढविण्यासंबंधी राइस मिल ग्रेडिंग, पॅकिंग, पीठ गिरणी, मसाला प्रक्रिया उद्योग, दालमिल, गोडाऊन, पाक हाऊस शेडिंग नेट वापरुन भाजीपाला उत्पादन शितगृह मका पासून पशुखाद्य, कोबडी, मस्या खाद्य उत्पादन यासारखे उदयोग उभारणी करण्याविषयी मार्गदर्शन केले. यांनी कृषी पायाभूत निधी योजनेचे प्रमुख लाभार्थी सोबतच इच्छुक लाभार्थी, कृषी उद्योजक, कृषि पदवीधर कंपनीचे संचालक गटाचे अध्यक्ष यांना यामध्ये “Post Harvest Componant”- काढणी पश्चात घटक उभारण्यासाठी लागणाऱ्या कर्जासाठी व त्या कर्जाची (CGTMSE -Nabkisan) हमी घेण्यासाठी सोबतच 3 टक्के व्याज सवलत मिळवण्यासाठी आणि इतर योजनेची सांगड घालून अनुदान (Subsidy) मिळण्याची संधी प्राप्त करण्यासाठी, “AIF योजने विषयी संपूर्ण माहिती दिली.
विकास पाटील, तालुका कृषी अधिकारी, मुलचेरा यांनी कृषि विभागाच्या सर्व योजना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, कृषि अभियांत्रिकी योजन कृषि औजारे बँक, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना; प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (pmfme) फलबाग लागवड, मस्य उत्पादन या विषयी मार्गदर्शन केले . यावेळी सचिन गोटे (अर्थशास्त्र तथा वित्त सल्लागार) व आकाश लवटे, (तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक मूलचेरा) हे उपस्थित होते. श्री दूधबावरे, कृषी पर्यवेक्षक यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर श्री. खंदारे, कृषी सहाय्यक यांनी आभार प्रदर्शन केले. सोबत कृषी विभागामधील सर्व कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक, सदस्य, गटाचे अध्यक्ष वैयक्तिक शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थित होते. असे नोडल अधिकारी, जिल्हा अंमल बजावणी कक्ष स्मार्ट प्रकल्प, प्रकल्प संचालक आत्मा जिल्हा गडचिरोली यांनी कळविले आहे.