राष्ट्रीय क्रीडा दिवसानिमित्त क्रीडा स्पर्धांचे आयोजन

राष्ट्रीय क्रीडा दिवसानिमित्त क्रीडा स्पर्धांचे आयोजन

        भंडारा, दि.23 : हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून 29 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो. या निमीत्ताने जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत 21 ते 29 ऑगस्ट दरम्यान विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात येत आहे.

 

क्रिडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,भंडारा जिल्हयातील एकविध क्रीडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 29 या दिनी       त्यामुळे या वर्षी सुध्दा जिल्हयात 29 ऑगस्ट 2023 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन व्यापक स्वरुपात जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजन करण्यात येणार आहे.त्याकरिता जिल्हयात खेळाचा प्रचार व प्रसार होण्याच्या दृष्टीने तसेच ग्रामीण क्षेत्रात खेळाचे महत्व समजण्यासाठी सोबतच युवकामध्ये खेळाविषयी जागरुकता निर्माण होण्याच्या दृष्टीने दिनांक या कालावधित तालुकास्तर,व जिल्हास्तर तसेच विभागस्तरावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

त्यामध्ये 18 ते 40 वर्षे वयोगटातील 100 मी.धावणे,योगा,फुटबॉल,स्वदेशी खेळ,इंडोअर खेळ-बॅडमिंटन,कॅरम,आर्म रेसलिंग,सोबतच मनोरंजनाचे खेळ जसे लंगडी,लिंबु चमचा सोबतच 41 ते 60 वर्ष वयोगटातील 50 मी.धावणे,300 मीटर धावणे,1 कि.मी.चालणे,खो-खो,योगा,स्वदेशी खेळ,इंन्डोअर खेळ,चेस, बॅडमिंटन,आर्म रेसलिंग तसेच 60 च्या वर वयोगटाकरिता 300 मीटर जोरात चालणे,1 कि.मी.चालणे,स्वदेशी खेळ,चेस व कॅरम या खेळाचा समावेश करण्यात आलेला आहे.

तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी  या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी,श्रीमती आशा मेश्राम यांनी कळविले आहे.