गडचिरोली जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय देसाईगंज अंतर्गत (आरमोरी व देसाईगंज)
तालुक्यातील पोलीस पाटील पदभरतीसाठी जाहीरात-2023 बाबत सूचना
गडचिरोली, दि.14: सर्व जनतेला कळविण्यात येते की, उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय देसाईगंज यांचे अंतर्गत (देसाईगंज व आरमोरी) एकूण 23 रिक्त पदे असून त्यामधील 9 पदे अनुसूचित क्षेत्रातील व 14 पदे बिगर अनुसूचित क्षेत्रातील आहेत. दिनांक 10/08/2023 रोजी काढलेल्या आरक्षणानुसार अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमाती याप्रवर्गाकरीता शिवणी खुर्द, देऊळगांव, भान्सी, वनखेडा, ठाणेगांव, चिचोली व अनुसूचित जमाती (महीला) याप्रवर्गाकरीता तुलतुली, लोहारा व चव्हेला ही गावे निश्चीत झालेली आहेत. त्याचप्रमाणे बिगर अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जाती या प्रवर्गाकरीता सावंगी, आकापुर चक, अनुसूचित जमाती प्रवर्गाकरीता सिर्सी, इ.मा.व प्रवर्गाकरीतादेविपुर कॅम्प, रावणवाडी, एकलपुर व अरसोडा, वि.जा.(अ) या प्रवर्गाकरीता नवरगांव, चोप, अराखीव (खुल्या) प्रवर्गाकरीता जुनी वडसा, वघाळा, भ.ज.(ड) या प्रवर्गाकरीता वडधा, भ.ज.(क) या प्रवर्गाकरीता किटाळी व आ.दु. घ.(आर्थीक दुर्बल घटकाकरीता) नैनपुर हे गांव निश्चीत झालेले आहेत. उक्त नमुद गावातील उचित अहर्ताधारक व्यक्तीकडून विहीत नमुन्यात अर्ज ऑफलाईन पध्दतीने दिनांक 16/08/2023 ते 24/08/2023 पर्यंत उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय देसाईगंज येथे मागविण्यात येत आहे. पोलीस पाटील या पदाचे सरळसेवा भरती प्रक्रीयेचा सविस्तर जाहीरनामा दिनांक 14/08/2023 रोजी सर्व संबंधीत गावात, तलाठी कार्यालय, तहसिल कार्यालय, पोलीस स्टेशन येथे प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी ईच्छुक स्थानीक उमेदवारांनी जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या पात्रतेचे निकष व विहीत अटी व शर्तीवर अर्ज उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, देसाईगंज येथे सादर करावा. असे जे. पी. लोंढे, अध्यक्ष, पोलीस पाटील पदभरती निवड समिती- 2023 तथा उपविभागीय दंडाधिकारी, देसाईगंज यांनी कळविले आहे.