सिंदेवाही पोलीस स्टेशनमध्ये ‘स्वाब’ संस्थेद्वारे पोलीस पाटलांना मार्गदर्शन.
‘स्वाब’ नेचर केअर संस्थेद्वारे 11/8 ला शुक्रवारी सिंदेवाही पोलीस स्टेशन मध्ये सिंदेवाही तालुका हद्दीतील संपूर्ण गावच्या पोलीस पाटलांच्या बैठकीमध्ये परिसरात ‘साप चावून होणारे मृत्यू, अंधश्रद्धा व कायदा ‘ या विषयावर मार्गदर्शन चर्चा सत्र घेण्यात आला.
सतत पर्यावरणाशी जुडून पर्यावरण व पर्यावरणातील प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या संरक्षणासाठी कार्य करणारी स्वाब नेचर केअर संस्था यांच्याद्वारे सध्या साप चावल्यामुळे होणाऱ्या मृत्यूच्या घटनांमध्ये आपल्या देशात व परिसरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे लक्षात घेत परिसरात अशा प्रकारच्या साप चावल्याने अंधश्रद्धेपोटी उपचाराअभावी कोणाचेही मृत्यू होऊ नये याकरिता पोलीस स्टेशन मध्ये तळोदी परिसरातील संपूर्ण गावच्या पोलीस पाटलांना सापाबद्दल सविस्तर माहिती देत साप चावल्याने होणाऱ्या मृत्यूच्या जास्तीत जास्त घटनांमध्ये अंधश्रद्धा आणि नागमोती हे जबाबदार असल्याने, गावागावांमध्ये मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करून लोकांमध्ये जागृती आणावी व जादूटोणा विरोधी कायदा 2013 च्या कायद्यानुसार सापाचे विष उतरवणाऱ्याचा ढोंग करणाऱ्या ‘नागमोत्यांवर’ गंभीर गुन्हे दाखल होऊन कशा पद्धतीने कार्यवाही करता येते यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळेस पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री तुषार चौहान यांनी या मार्गदर्शन कार्यक्रमा विषायी बोलताना सांगितले की समोर अशा घटना टाळण्याकरता गावागावात अशा प्रकारचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्याची नितांत आवश्यकता आहे. तरी प्रत्येक पोलीस पाटलांनी आपल्या गावामध्ये असे शिबिर आयोजित करावे असे पोलीस पाटलांना सुचविले. व प्रत्येक गावच्या पोलीस पाटलांनी स्वाब संस्थेच्या सदस्यांशी व सर्पमित्रांशी जुडून राहावे, व कोणतीही साप चावल्यासारखी किंवा वन्य जीवाची अप्रिय घटना घडल्यास संस्थेचे सहकार्य घ्यावे असे सांगितले.
यानंतर मार्गदर्शन करताना ‘आपल्या परिसरात आढळणारे फक्त चारच प्रकारचे विषारी तर बाकी संपूर्ण साप बिनविषारी आढळतात. कोणतेही साप चावल्यानंतर योग्य ती काळजी न घेता नागमोत्यां कडे जाऊन वेळ वाया घालवून उपचारात उशीर केल्यामुळे जीव गमावला जातो. तर औषधी उपचार घेण्यापासून अडवून मंत्राने विष उतरवण्यात चा नाटक करणाऱ्या बुवा बाबांवर जादूटोणा विरोधी कायदा 2013 चे कलम 2 (ख) अनुसूची 9 अनुसार कोणती कारवाई होते= या संदर्भात सविस्तर माहिती देत,”यानंतर बुवा बाबाच्या नादी न लागता कोणताही साप चावल्यानंतर तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार करावा” असे आवाहन ‘स्वाब’ संस्था चे अध्यक्ष व अ.भा.अनिस चे नागभीड तालुका संघटक श्री यश कायरकर यांनी केले.तर आभार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गोवर्धन यांनी करताना आपली जबाबदारी समजून प्रत्येक पोलीस पाटलांनी स्वाब संस्थेच्या संपर्कात राहून कोणत्याही साप, किंवा वन्यजीवांचा बाबतीत अनुचित घटना घडल्या तर तात्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधावा असे सांगितले. व नेहमी पर्यावरणामध्ये घडनार्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस पोलीस व वन विभागाला, समाजाला सहकार्य करणाऱ्या ‘स्वाब’ संस्थेच्या सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागतही केले.
यावेळी सिंदेवाही पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर महाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक नेरलवार, तथा संपूर्ण पोलीस कर्मचारी, ‘स्वाब’ संस्थेचे जिवेश सयाम,हितेश मुंगमोडे , सुरज गेडाम, नितीन भेंडाळे, गणेश गुरनूले, कान्हा करकाळे, विकास लोणबले, तुषार शिवनकर, शुभम सुरपाम, डब्ल्यू पीएसआयचे रोशन धोत्रे, तथा सिंदेवाही परिसरातील प्रत्येक गावचे पोलीस पाटील यावेळेस उपस्थित होते.