चिमुकल्या बालकांनी घेतली गाव बालविवाहमुक्त करण्याची शपथ
अहेरी तालुक्यातील व्यंकटापूर येथील जिल्हा परिषद शाळेत बाल संरक्षण विषय मार्गदर्शन
गडचिरोली,दि.13:अहेरी तालुक्यापासून 32 किमी अंतरावर असलेले व्यंकटापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या बालकांनी बालविवाह करनार नाही तसेच आम्ही आमच्या गावात आणि आमच्या कुटुंबात बाल विवाह होऊ देणार नाही तसेच बालविवाहाच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नाही याविषयी शपथ घेतली.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर, व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरणुले यांच्या मार्गद्शनाखाली जिल्ह्यात बाल संरक्षण, बालविवाह, बाल लैंगिक संरक्षण, बाल कामगार याविषय जनजागृती करण्याचे कार्य व बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे कार्य जिल्हा बाल संरक्षण कक्षाव्दारे सुरू आहे.
दिनाक 11 ऑगस्ट 2023 रोज शुक्रवारला जिल्हा बाल संरक्षण कक्ष गडचिरोली येथील क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार यांनी अहेरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यंकटापूर येथे शिकणाऱ्या बालकांना गाव बालविवाहमुक्त करण्याची शपथ देवून बालविवाहचे दुष्यपरिनाम, बालकांचे अधिकार, बाल संगोपन योजना याविषय मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित शाळेतील शिक्षक अजय कापगते तसेच ग्राम बाल सरक्षण समितीचे सदस्य सचिव अंगणवाडी सेविका ललिता पागडे व ग्राम पंचायत सदस्य खुशाल तलांडे उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यात मागील तीन वर्षात जवळपास 16 बालविवाह थांबवण्यात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला यश प्राप्त झाले होते. जिल्ह्यात बालविवाह होवू नये याकरिता जिल्हा प्रशासनाच्या वतीने बालविवाहमुक्त करण्याची मोहीम हाती घेवून, बालविवाहाचे दुष्यपरिनाम याविषय जागृत करण्याचे कार्य सुरू केलेले आहे.