निवासी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र वितरण
चंद्रपूर, दि. 09 : साईबाबा बहुउद्देशीय शिक्षण संस्था पिट्टीगुडा ता. जिवती द्वारा संचालित दिगांबर नाईक निवासी पोलीस भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण केंद्र, चंद्रपूर येथे 24 एप्रिल ते 24 जुलै 2023 पर्यंत 90 दिवसापासून निवासी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सुरू होते. सदर प्रशिक्षणामध्ये लेखी परीक्षेसह मैदानी चाचणी, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञांकडून मार्गदर्शन प्रशिक्षणार्थ्यांना या 90 दिवसाच्या कालावधीत देण्यात आले. या निवासी पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाचा निरोप समारंभ तथा प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम नुकताच पार पडला
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अशोक जाधव, चंद्रपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण, सचिव शशिकला राठोड, कैलाश जाधव, प्रकाश जाधव, सचिन जीवतोडे, महेश निमसटकर, राहुल राठोड, दिलीप ताटेवार, अमित मेश्राम, आब्बेसुमा पठाण, सिंधु ठमके, छाया सोनुले आदींची उपस्थिती होती.
यावेळी श्री. जाधव म्हणाले, प्रशिक्षणार्थी भावी पोलिसासोबतच विविध पदावर कार्यरत होऊन कर्तव्य बजावणार आहेत. ध्येय साध्य करण्यासाठी परिश्रमाची जोड आवश्यक आहे. या निवासी पोलीस भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षणाचा लाभ घेऊन येणाऱ्या पोलीस भरतीत विद्यार्थी मोठ्या संख्येने यशस्वी होईल, यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन ऐश्वर्या वाघमारे तर आभार करूणा रामटेके यांनी मानले.