अहेरी तहसिल कार्यालयाकडून महसूल सप्ताहात
419 विविध दाखल्याचे वितरण
गडचिरोली, दि.08:महाराष्ट्र शासन महसूल विभागाकडून देण्यात येणा-या आणि विभागाव्दारे राबविण्यात येणा-या विविध योजना याबाबत राज्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना लाभ घेता यावा, तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा, यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने तहसिल कार्यालय अहेरी प्रशासनाव्दारे महसूल सप्ताहातील महसूल सप्ताह सांगता समारंभ या कार्यक्रमाचे तहसिल कार्यालय, अहेरीचे सभागृहात आयोजन करण्यात आले. या महसूल सप्ताह सांगता समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय भाकरे, अपर जिल्हाधिकारी, अहेरी हे होते तर विशेष अतिथी फारुख शेख, तहसिलदार अहेरी, प्रमुख अतिथी संदेश खरात, तालुका कृषी अधिकारी, श्री. दाते, मुख्याधिकारी तथा तहसिलदार अहेरी, श्री. राऊत, सहा.गट विकास अधिकारी हे मंचावर उपस्थित होते. मान्यवरांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले.
महसूल सप्ताहातील दिनांक 01/08/2023 ते 07/08/2023 यो 7 दिवसाच्या कार्यक्रमात महसूल दिन, युवा संवाद, एक हात मदतीचा, जन संवाद, सैनिक हो तुमच्या साठी, सेवा निवृत् अधिकारी व कर्मचारी संवाद या कार्यक्रमाचे आयोजन तहसिल कार्यालय अहेरी येथे करण्यात आले असून त्यामध्ये उत्पन्न् प्रमाणपत्र 263, जात प्रमाणपत्र 15, नॉन क्रिमीलेयर 2, अधिवास प्रमाणपत्र 23, 30% महिला आरक्षण प्रमाणपत्र 2, शेतकरी दाखले 6, शिधापत्रिका 15 ,आर्थिक दृष्ट्या मागासलेला असलेबाबत प्रमाणपत्र 7 तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी योजने अंतर्गत 33 तसेच मतदार नोंदनी फार्म नमूना-6 40 विद्यार्थ्याना व नागरिकांना वितरीत करण्यात आले. तसेच नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसानग्रस्त 13 लाभार्थ्यांना रुपये 685000/- रक्कमेचे धनादेश वितरण करण्यात आले.
सप्ताहात महसूल कर्मचारी व नागरीक यांचे करीता तलाठी स्तरावर वेगवेगळ्या शिबीराचे आयोजन करण्यात आले. संजय गांधी निराधार अनुदान योजना, रोजगार हमी योजना, अन्न व नागरी पुरवठा, नैसर्गीक आपत्ती, गौन खनिज, महसूल वसूली या योजने विषयी माहिती व प्रसिध्दी करण्यात आली. क्षेत्रीय स्तरावर सर्कल मध्ये फेरफार अदालत घेण्यात आले. यावेळी मान्यवरांनी यथोचित मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास नायब तहसिलदार सैय्यद , कु. कल्पना सुरपाम, मंडळ अधिकारी मोरेश्वर संतोष श्रीरामे, कु. दर्शना कुळमेथे, एकनाथ चांदेकर, तसेच तहसिल कार्यालयातील अव्वल कारकून, महसूल सहाय्यक तथा समस्त् तलाठी, कोतवाल कर्मचारी, नागरिक बहूसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन एकनाथ चांदेकर, यांनी तर आभार प्रदर्शन विनोद दहागांवकर यांनी केले.