टग-ऑफ-वार असोसिएशन, चंद्रपूर जिल्ह्यातिल खेळाडूची राष्ट्रीय स्पर्धेत निवड
चंद्रपुर :- टग-ऑफ-वार असोसिएशन, चंद्रपूर येथील कु. धम्मज्योति रविंद्र रायपुरे ही तामिलनाडु राज्यातील नामाकल जिल्ह्यामधील त्रिरुचेनगोडे येथे सुरु असलेल्या राष्ट्रिय टग-ऑफ-वार स्पर्धेकरिता निवड झालेली आहे. दिनांक २१ ते २३ जुलै २०२३ रोजी सुरु असलेल्या ३६ वी सिनिअर टग-ऑफ-वार स्पर्धेकरिता महाराष्ट्र टग-ऑफ-वार असोसिएशननी मुलींचा संघ जाहिर करण्यात आला आहे. या ३६ वी सिनिअर टग-ऑफ-वार स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात टग-ऑफ-वार असोसिएशन, चंद्रपूर जिल्ह्यातील कु. धम्मज्योति रविंद्र रायपुरे हिची निवड झालेली आहे. *विशेष म्हणजे कु. धम्मज्योति रविंद्र रायपुरे ही चंद्रपुर जिल्ह्यातील पहिली राष्ट्रिय टग-ऑफ-वार खेळाडू होणाचा मान मिळवला या यशाबद्दल कु. धम्मज्योति रायपुरे हिची सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.* सदर खेळाडूंला प्रशिक्षक व मार्गदर्शक म्हणून टग-ऑफ-वार असोसिएशन, चंद्रपूर जिल्ह्याचे सचिव प्रा .विक्की तुळशीराम, पेटकर, इखलाक पाठन व रिंकेश ठाकरे यांचे मोलाचे मार्गदर्शक लाभले.
खेळाडूच्या यशाबद्दल टग ऑफ वार असोसिएशन, चंद्रपुरचे अध्यक्ष मा. डॉ. अनिस अहमद खान, उपाध्यक्ष डॉ. विजय सोमकुंवर, डॉ. शैलेन्द्र गिरिपुंजे, टग ऑफ वार असोसिएशन, चंद्रपुरचे सचिव प्रा .विक्की तुळशीराम पेटकर, सहसचिव श्री. बंडू डोहे, कोषाध्यक्ष सौ. वर्षा घटे, सहकोषाध्यक्ष श्री. हर्षल क्षिरसागर, सल्लागार श्री. विश्वास इटनकर, राकेश ठावरी, सौरभ बोरकर, इखलाक पाठन, रिंकेश ठाकरे, रुचिता आंबेकर व शितल बोरकर यांनी यांनी सुध्दा खेळाडूचे कौतुक करून अभिनंदन केले