स्वच्छतेस सरसावले हजारो हात
सुंदर माझे उद्यान व ओपन स्पेस स्पर्धेअंतर्गत नागरिकांचे श्रमदान
चंद्रपूर २८ जुलै – शहरातील उद्याने व खुल्या जागांच्या स्वच्छतेसाठी हजारो हात सरसावले असुन आपल्या परिसरात विरंगुळ्याच्या जागा निर्माण करण्यास व त्या स्वच्छ राहण्यास मनपाद्वारे आयोजीत स्पर्धेच्या माध्यमातुन शहरातील नागरिक एकसंघ बनुन श्रमदानाचे कार्य करीत आहेत.
आज जवळपास शहरातील प्रत्येक भागात एक उद्यान अथवा मोकळी जागा आहे, ज्या परिसरात उद्यान नवीन आहेत किंवा जेथील नागरिक जागरूक आहेत तेथील उद्यान अथवा मोकळी जागा यांची स्थिती उत्तम आहेत. मात्र शहरातील सर्वच उद्याने अथवा मोकळ्या जागा या सुंदर बनुन नागरिकांसाठी विरंगुळाच्या जागा बनव्यात यादृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ” सुंदर माझे उद्यान ” व ” सुदंर माझी ओपन स्पेस ” या २ स्पर्धा घेण्यात येत आहेत.
स्पर्धेअंतर्गत एकुण ६० संघ सहभागी झाले असुन परिसरातील महिला व पुरुष मंडळी दररोज सुविधेनुसार वेळ काढुन संयुक्तपणे उद्यान अथवा मोकळी जागा स्वच्छ करत असुन परिसरात जनजागृती सुद्धा करीत आहेत. लोकसहभागातुन या जागांचा विकास व सौंदर्यीकरण होत असल्याने परिसरातील नागरिक सजग राहुन सदर जागा कायमस्वरूपी चांगल्या स्थितीत राहण्यास काळजी घेतील हाच या उपक्रमाचा उद्देश आहे.
प्रत्येक सहभागी गटांना सहकार्यासाठी मनपातर्फे नियंत्रक अधिकारी व नोडल ऑफीसर नेमण्यात आले असुन उद्यान अथवा खुल्या जागेत पाऊलवाट कुठे करावी,क्रीडांगण कुठे असावे,झाडे,खेळणी,बेंचेस,कचराकुं
जागृत नागरिकांद्वारे केल्या जाणाऱ्या उत्कृष्ट कामांना मनपातर्फे पुरस्कार दिले जाणार असुन रोख रक्कम,ट्रॉफी आणि त्या वॉर्डच्या विकासकामांसाठी काही लक्ष रुपयांचा निधी सुद्धा देण्यात येणार आहे. स्पर्धेच्या माध्यमातुन उद्यान,मोकळ्या जागा सुस्थितीत राखणे ही पालिकेसोबत माझीही जबाबदारी आहे भावना या स्पर्धेतुन विकसित होणार असल्याने स्पर्धेस उत्स्फुर्त प्रतिसाद देण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.