पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 

चंद्रपूर, दि.21 : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मनगंटीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार, दि. 22 जुलै 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता नियोजन भवन, चंद्रपूर येथे जिल्हास्तरावरील प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांची अतिवृष्टी संदर्भात बैठक. सकाळी 11:15 वाजता चंद्रपूर येथून मुल-सोमनाथकडे रवाना. दुपारी 12:15 वाजता सोमनाथ येथे आगमन व सोमनाथ देवस्थान मुल येथील सोमनाथ सफारी पर्यटन गेटचे उद्घाटन समारंभास उपस्थिती. दुपारी 1 वाजता मुल तालुक्यातील मोरवाही येथे उमा नदीवरील मोठ्या उंच पुलाचे व पोचमार्ग लोकार्पण समारंभास उपस्थिती. दुपारी 2 वाजता डोंगरगाव येथे उमा नदीवरील मोठ्या उंच पुलाचे व पोचमार्ग लोकार्पण समारंभास उपस्थिती. दुपारी 2: 45 वाजता राजोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे लोकार्पण समारंभास उपस्थिती. सायंकाळी 5:30 वाजता बेंबाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे लोकार्पण. सायंकाळी 6:30 वाजता मुल येथे वाल्मिकी समाज गेट भूमिपूजन समारंभ. सायंकाळी 6:45 वाजता शासकीय विश्रामगृह, मूल येथील नुतन इमारतीचे उद्घाटन समारंभास उपस्थिती. सायंकाळी 7:15 वाजता कन्नमवार सभागृह, मूल येथे अग्निशमन सेवांचे बळकटीकरण अंतर्गत अत्याधुनिक अग्निशमन वाहनाचे व स्वच्छ भारत अभियानातंर्गत विविध वाहन उपकरणांचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 7:30 वाजता कन्नमवार सभागृह, मुल येथे सभा. रात्री 8:30 वाजता मुल येथून चंद्रपूरकडे प्रयाण.

रविवार, दि. 23 जुलै 2023 रोजी दुपारी 12 वाजता मुल येथे आगमन व शामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, मुल येथे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. दुपारी 2 वाजता कन्नमवार सभागृह, मुल येथे पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांचा व तालुक्यात डॉक्टरेट पदवी मिळालेल्या व्यक्तींचा सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3 वाजता उपविभागीय कार्यालय, मुल येथे मुल तालुक्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक. सायंकाळी 5 वाजता सोयीनुसार मूलवरून चंद्रपूरकडे प्रयाण करतील.