मतदार नोंदणीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे-जिल्हाधिकारी
छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम
भंडारा दि 20: 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून मतदार नोंदणीसाठी नागरिकांनी बीएलओंना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री.कुंभेजकर यांनी केले आहे.
आज सर्व तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्या सोबत घेतलेल्या बैठकीत जिल्हाधिका-यांनी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा आढावा घेतला.नागरीकांच्या सोईसाठी भारत निवडणूक आयोगाने ऑनलाईन पध्दतीने मतदार नोंदणी करणेसंबंधीत Nvsp.in ही वेबसाईट उपलब्ध करुन दिलेली आहे.
त्याचप्रमाणे नागरीकांना भारत निवडणूक आयोगाचे Voter Helpline App मोबाईल अप्लीकेशनव्दारे देखील मतदार नोंदणी घर बसल्याच करता येईल. त्याचप्रमाणे नागरीकांना संबंधीत मतदार नोंदणी अधिकारी, बीएलओकडे देखील ऑफलाईन पध्दतीने मतदार नोंदणी करुन अर्ज सादर करता येईल.
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत पूर्व –पुनरीक्षण उपक्रमामध्ये दि. 21 जुलै ते 21 ऑगस्ट या महीन्याभराच्या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी घरोघरी जावून पुढील तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले.प्रत्येक गावामध्ये तलाठी.BLO,ग्रामसेवक,गावातील वरिष्ठ नागरिक यांचा गट तयार करून त्यांच्या कडून मतदार यादीतपासून घावी, मयत व कायमस्वरूपी स्थलांतरित मतदाराबाबत संबंधिताकडून फॉर्म न.7 भरून घ्यावे. मयत व कायमस्वरूपी स्थलांतरित मतदाराबाबत BLO कडून पडताळणी करून पंचनामा, फॉर्म नं.7, सुनावणीच्या आधारे मतदार यादीतून नोंदणीची वगळणी करण्यात यावी याबाबत बैठकीत चर्चा झाली.
त्यामुळे मतदारांना आपले मतदान ओळखपत्र दुरुस्ती, नवमतदार नोंदणी, मतदान ओळखपत्र आधार कार्डशी जोडणी, मतदार यादीतील नाव कमी करणे अशी सर्व काम करता येणे सहज शक्य होईल. मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त नागरीकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.