कन्यादान योजनेचा लाभ घ्यावा- सहायक आयुक्त
भंडारा, दि. 18: सामाजिक न्याय विभागामार्फत सामूहिक विवाह सोहळयात भाग घेऊन विवाह करणाऱ्या अनुसूचित जाती व नवबैध्द दाम्पंत्याकरिता कन्यादान योजना सन 2002-03 पासून सुरु करण्यात आलेली आहे.या योजनेअंतर्गत सामुहिक विवाह सोहळयात भाग घेऊन विवाह करणाऱ्या वधुचे पालकास 20 हजार रुपये व संस्थेत प्रत्येक जोडप्यामागे 4 हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते.
या योजनेअंतर्गत सन 2023-24 या वर्षाकरीता अर्ज मागणविण्यात येत असून सामूहिक विवाह सोहळयात भाग घेऊन विवाह करणाऱ्या दाम्पंत्यांनी सहायक आयुक्त,समाज कल्याण,विभागाकडे सामुहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या संस्थेमार्फत आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावे,तसेच अर्जाचा नमूना सहायक आयुक्त समाज कल्याण, कार्यालयात उपलब्ध करण्यात आलेला आहे.