पोमकें पातागुडम येथे नवीन प्रशासकिय ईमारत उद्घाटन सोहळा व गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून जनजागरण मेळावा पार पडला
” चे माध्यमातुन आज दिनांक १४/०७/२०२३ रोजी पोलीस मदत केंद्र पातागुडम येथील नवीन ईमारतीचे उद्घाटन संमारंभ तसेच गडचिरोली पोलीस दलाच्या “पोलीस दादालोरा खिडकी गडचिरोली जिल्हयातील जनतेचे जीवनमान उंचवण्याच्या उद्देशाने पोमके पातागुडम येथे आयोजित करण्यात आलेला जनजागरण मेळावा गडचिरोली परिक्षेत्राचे मा. पोलीस उपमहानिरीक्षक श्री. संदीप पाटील सा. यांचे उपस्थितीत पार पडला.
यावेळी उपविभाग सिरोंचा अंतर्गत पोमकें पातागुडम हद्दीतील ५०० च्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. उपस्थित आदीवासी बांधवांना कार्यक्रमस्थळी विविध प्रकारचे साहित्यांचे वाटप करण्यात आले. त्यात साडी, स्प्रे पंप, नोटबुक, पेन, पुस्तके, छत्री, क्रिकेट बॅट-बॉल, स्टंप-बेल्स व व्हॉलीबॉल इत्यादी साहीत्यांचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमात मा. पोलीस उपमहानिरिक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. संदीप पाटील सा. यांच्या हस्ते एक गाव एक वाचनालय या उपक्रमांतर्गत १०० पुस्तके भेट दिली. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आगामी काळात गडचिरोली पोलीस दलाकडुन दिल्या जाणाऱ्या रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा आणि त्या दृष्टीकोनातून प्रयत्न करावे तसेच गडचिरोली पोलीस दल रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सदैव आपल्या पाठीशी आहेत असे आश्वासन दिले. तसेच मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी अतीदुर्गम भागातील जनतेने पोलीस दलात भरती व्हावे यासाठी आम्ही गडचिरोली येथे भरती पूर्वप्रशिक्षणाचे आयोजन केले आहे, त्याचा अधिकाधिक युवक-युवकांनी लाभ घेऊन पोलीस दलात भरती व्हावे असे आवाहन केले. यासोबतच मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. यांनी तेलगू भाषेतून नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
आतापर्यंत गडचिरोली प्रशासनाकडुन पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून सुरक्षा रक्षक ५५१, नर्सिंग असिस्टंट १२३७, हॉस्पिटॅलिटी ३२३, ऑटोमोबाईल २७६, ईलेक्ट्रीशिअन २०१, सेल्समैन ०५, प्लंबींग ३५, वेल्डींग ३८, जनरल ड्यूटी असिस्टंट ३८४, फील्ड ऑफीसर ११ व व्हीएलइ ५२ असे एकुण ३२६८ गडचिरोली जिल्हयातील युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच कृषी
तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआय आरसेटी गडचिरोली यांचे मार्फत ब्युटीपार्लर १७४, कुक्कुट पालन ५८५, बदक पालन १००, शेळी पालन १७७, शिवणकला २७७, मधुमक्षिका पालन ५३, फोटोग्राफी ६५, सॉफ्ट टाईज ३५, एमएससीआयटी २३१, वाहन चालक ५९२, भाजीपाला लागवड १३९५ पोलीसभरती पुर्व प्रशिक्षण १०६२, टु व्हिलर दुरुस्ती १३४, मत्स्यपालन ११२, वराहपालन १०, फास्ट फुड १३०, पापड लोणचे ५९, कराटे प्रशिक्षण ४८ असे एकुण ५२३९ युवक/युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमास मा. पोलीस उप महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. संदीप पाटील सा., मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख
सा., व उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा श्री. सुहास शिंदे हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाची प्रस्तावना पोउपनि श्री. श्रीकिशन कांदे यांनी केले असून आभार प्रदर्शन मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा श्री. सुहास शिंदे सा. यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोउपनि ऋषिकेश तळेकर, पोउपनि अभिजीत तुतुरवड, पोउपनि श्रीकिशन कांदे व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.