राज्य क्रीडा परिषदेवर दोन अशासकीय सदस्यांची निवडीबाबत
गडचिरोली,()दि.14: राज्य क्रीडा परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. क्रीडा परिषदेची पुनर्रचना करण्यासाठी जिल्ह्यातून पात्रताधारक असलेल्या अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी पात्र इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अशासकीय सदस्य हा आंतरराष्ट्रीय खेळाडू ऑलिंम्पिक, एशियन जागतिक स्पर्धा असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील केंद्र, राज्य क्रीडा पुरस्कारार्थी, नामांकित प्रशिक्षक हे केंद्र व राज्य शासनातर्फे दिले जाणारे सर्व क्रीडा पुरस्कारधारक असावा, पात्रता धारण करणारे नसल्यास जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा पुरस्कारार्थीचा विचार करण्यात येणार आहे. अशासकीय सदस्यांचा राज्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी अनुभव, मार्गदर्शक सुचना मिळतील. यासाठी जिल्ह्यातील दोन खेळाडूंची शिफारस आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडे करावयाची आहेत. यासाठी इच्छुकांनी दि. 17 जुलै 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपले संपुर्ण नाव, पत्ता, ई-मेल, मोबाईल क्रमांक व क्रीडा क्षेत्रात केलेल्या कामांची माहिती. तसेच क्रीडा क्षेत्रातील केंद्र, राज्य पुरस्कार मिळाल्याबाबतची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा व सांस्कृतिक भवन, कॉम्पलेक्स, गडचिरोली येथे सादर करावी. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, प्रशांत दोंदल यांनी केले आहे.