10 जुलै रोजी मत्स्यशेतकरी दिन साजरा
भंडारा, दि. 13: सहायक आयुक्त, मत्स्यव्यवसाय कार्यालय येथे 10 जुलै रोजी राष्ट्रीय मत्स्यशेतकरी दिन साजरा करण्यात आला. मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी महेश हजारे यांनी उपस्थितांना बांध प्रजननाचे उत्पादन वाढविणे व योग्य नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय उमाकांत सबनीस, माजी नगर सेवक पृथ्वीराज तांडेकर, जिल्हा मच्छिमार संघ व संचालक प्रकाश पचारे, जिल्हा मच्छिमार संघ संचालक गजानन बादशाह, सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी महेश हजारे, सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी तुमसर दुर्गेश केंडे, सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी पवनी अक्षय सोनवने, सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी साकोली रोहित चौकडे व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थाचे पदाधिकारी व सभासद तसेच प्रधानमंत्री मत्ससंपदा योजनेचे लाभार्थी व मत्स्यकास्तकार शेतकरी उपस्थित होते.
जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी किसान क्रेडीट कार्ड, प्रधान मंत्री विमा सुरक्षा या सारख्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय उमाकांत सबनीस यांनी केले. चर्चासत्रामध्ये मत्स्यव्यवसाय व्यापार साखळी निर्माण करणे व जिल्हयात मासोळी बाजार निर्मिती करण्याबाबत चर्चा करण्यातआली.