डेअरी फार्मींग व डेअरी बिझनेस ऑनलाईन वेबीनारद्वारे मार्गदर्शन सत्र संपन्न

डेअरी फार्मींग व डेअरी बिझनेस ऑनलाईन वेबीनारद्वारे मार्गदर्शन सत्र संपन्न

 

भंडारा, दि. 11: जिल्ह्यातील नवउद्योजक तसेच डेअरी क्षेत्रामध्ये नवीन व्यवसाय/उद्योग सुरू करण्याची इच्छा बाळगणाऱ्या युवक व युवतींसाठी महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा या जिल्हा कार्यालयामार्फत आज “डेअरी फॉर्मींग व डेअरी बिझीनेस” या विषयावर ऑनलाईन वेबिनारद्वारे मार्गदर्शन सत्र संपन्न झाले.

या वेबीनारमध्ये प्रमूख मार्गदर्शक म्हणून डॉ. विवेक दरवई, डेअरी मंत्रा प्रा. लि. नागपूर हे उपस्थित होते. तसेच, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,भंडारा कार्यालयातील श्सुधाकर झळके सहायक आयुक्त, भाऊराव निंबार्ते, क.कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, श्सोनू उके, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक, मीरा मांजरेकर, महात्मा गांधी नॅशनल फेलो तसेच कार्यालयातील इतर कर्मचारी वृंद हे उपस्थित होते.

या वेबीनारमध्ये एकूण 146 युवक व युवतींनी ऑनलाईन उपस्थिती दर्शविली होती. सदर वेबिनार मध्ये डॉ. विवेक दरवई, डेअरी मंत्रा प्रा. लि. नागपूर, यांनी “डेअरी फॉर्मींग व डेअरी बिझीनेस” या विषयावर उपस्थित युवक व युवतींना मार्गदर्शन केले. त्यांनी डेअरी क्षेत्रात स्वतःचा उद्योग/ व्यवसाय करण्यासाठी कोणती कौशल्य आवश्यक आहेत, स्वतःचा दुग्धव्यवसाय कसा वाढवावा, त्यासाठी लागणारी आवश्यक तंत्र कौशल्ये कोणती आहेत, दुग्धव्यवसाय क्षेत्रातील अडचणी, दुग्धव्यवसाय प्रक्रीया, दुग्धव्यवसाय व्यवस्थापन कसे करावे, दुग्धव्यवसाय करताना कोणत्या गोष्टी माहीती असणे आवश्यक आहे, कोणते बारकावे आपण लक्षात घेतले पाहिजे इ.तसेच त्यामधील तांत्रिक माहिती बाबत पावरपॉईट प्रेझेनटेशनद्वारे सविस्तर व उपयुक्त मार्गदर्शन केले.

तसेच, श्री.सुधाकर झळके, सहायक आयुक्त यांनी दुग्धव्यवसाय हा शेतीला पुरक व्यवसाय अतिशय उपयुक्त्‍ व्यवसाय आहे. स्वत:चा व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय हा उत्तम पर्याय ठरू शकतो. त्यासाठी आपण सदर क्षेत्रातील परीपूर्ण माहिती घेऊन उज्ज्वल करीअर करू शकतो याबाबत उपस्थित युवक व युवतींना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच, याबाबत काही अडचण किंवा सदर क्षेत्रात प्रशिक्षण घ्यायचे असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,भंडारा या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या वेबीनारच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,भंडारा कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी आदींनी परीश्रम घेतले.