राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत जुलै महिन्यातील अन्नधान्य वाटपाबाबत

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत जुलै महिन्यातील अन्नधान्य वाटपाबाबत

गडचिरोली,दि.08: गडचिरोली जिल्हयातील सर्व रेशनकार्डधारकांना सुचित करण्यात आले आहे की, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत माहे जुलै-२०२3 करिता अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील पात्र लाभार्थ्यांना गहू, मका, तांदूळ व साखरेचे नियतन व वाटप परिमाण निश्चित करण्यात आलेले आहे.

अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रती शिधापत्रिका २५ किलो तांदुळ रुपये ३ प्रति किलो प्रमाणे, गहू 05 किलो २ रुपये प्रति किलो प्रमाणे, 5 किलो मका रुपये 1 तर १ किलो साखर २० रुपये प्रति किलो प्रमाणे. तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना प्रती व्यक्ती ३ किलो तांदुळ ३ रुपये प्रति किलो प्रमाणे, 1 किलो गहू २ रुपये प्रति किलो प्रमाणे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना रु.3/- प्रतिकिलो तांदूळ, रु.2/- प्रतिकिलो गहू व रु.1/- प्रतिकिलो भरडधान्य या दराने वितरीत करण्यात येणारे अन्नधान्य दिनांक दिनांक 01 जानेवारी, 2023 ते 31.12.2023 पर्यंत एक वर्षाच्या कालावधीकरीता अनुज्ञेय असलेले अन्नधान्‍य पात्र लाभार्थ्यांना मोफत वितरीत करावयाचे शासन निर्देश प्राप्त आहे.

तसेच या जिल्ह्यात मका हे भरडधान्याची खरेदी करण्यात आलेली असून खरेदी केलेला मका या भरडधान्याचे सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरण करण्याचे शासन निर्देश प्राप्त असून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत गडचिरेाली जिल्ह्यातील अंत्योदय अन्न्‍ योजना व प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांसाठी माहे जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर 2023 या तीन महिन्याकरीता गव्हाचे नियतन कमी करुन त्याऐवजी मक्याचे वितरण करण्यात येत आहे.

तरी सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना सुचित करण्यात येते की, त्यांना नेमून दिलेल्या रास्तभाव धान्यदुकानात जावून आपले शिधापत्रिकेवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील माहे जुलै 2023 या महिन्यातील नियमित देय असलेल्या धान्याची (गहू, मका व तांदूळ) मोफत उचल करावी. व धान्य घेतेवेळी POS मशीन मधून निघणारी पावती रास्तभाव दुकानदाराकडून घ्यावी. व दुकानांत एकाच वेळी गर्दी न करता सामाजिक अंतराचे पालन करावे. असे जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.