दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत
मनपातर्फे ४१ महिला लाभार्थ्यांना देण्यात आले ७ लक्ष रुपयांचे अनुदान
चंद्रपूर ५ जुलै – महिलांना स्वयंरोजगार मिळावा व त्यामाध्यमातुन त्यांचे कुटुंब आर्थिक सक्षम व्हावे म्हणून शासनाद्वारे दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान चालविले जात आहे. याअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ४१ महिला लाभार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यास एकुण ७ लक्ष रुपयांचे अनुदान आतापर्यंत देण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत ज्या महिलांना स्वतःचा नविन व्यवसाय सुरु करावयाचा असेल अथवा सुरु असलेल्या व्यवसायात वाढ करावयाची असेल तर २ लक्ष रुपयांचे कर्ज बँकेमार्फत उपलब्ध करून दिल्या जाते. या कर्जावर मनपा महिला व बालकल्याण विभागामार्फत २५ टक्के किंवा ज्यास्तीत ज्यास्त २५ हजार रुपयांचे अनुदान दोन टप्यात देण्यात येते.
चंद्रपूर मनपाच्या माध्यमातुन आतापर्यंत ४१ महिला लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असुन त्यांना एकुण ७ लक्ष रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. ज्यास्तीत ज्यास्त महिलांनी व्यवसायाला सुरवात करून आत्मनिर्भर व्हावे व आपल्या कुटुंबाला हातभार लावुन आर्थिक प्रगती व्हावी हा या मागचा उद्देश आहे.
ज्या महिला लाभार्थ्यांना नविन व्यवसाय सुरु करावयाचा असेल अथवा सुरु असलेल्या व्यवसायात वाढ करावयाची असेल त्यांनी कर्ज घेण्याकरीता व अधिक माहितीकरीता मनपा दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कार्यालय ( बीपीएल ऑफीस ),सरकारी दवाखान्यामागे,कस्तुरबा रोड ज्युबली शाळेसमोर या ठिकाणी कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचा आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येतआहे.