गडचिरोली जिल्ह्यात 144 कलम लागू
गडचिरोली, दि.04: महामहीम राष्ट्रपती, भारत सरकार यांचा एक दिवसीय दौरा कार्यक्रम हा निश्चीत झाला असून दिनांक ०५/०७/२०२३ रोजी मा. महामहीम राष्ट्रपती, भारत सरकार यांचे पोलीस स्टेशन गडचिरोली हद्दीत
आगमन होणार आहे. दिनांक ५/०७/२०२३ रोजी गोंडवाना विदयापीठ गडचिरोली येथिल दिक्षांत समारंभ मध्ये मा.
महामहीम राष्ट्रपती, भारत सरकार हे उपस्थित राहणार आहेत.
मा. महामहीम राष्ट्रपती, भारत सरकार यांना दहशतवादी संघटनाकडून संभाव्य धोका तसेच Non-Conventional Aerial Objects, Drones, remote controlled or remotely piloted aircrafts, aircraft systems, para-gliders, aero-models, parachute कडून असलेल्या नविनतम
धोका लक्षात घेता सुरक्षेच्या उपाययोजनेचा भाग म्हणून संपूर्ण गडचिरोली पोलीस स्टेशनच्या हद्दीला “नो ड्रोन
झोन” घोषीत करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग १ मध्ये उप-विभाग यांचे कडील अधिसुचना आदेशाने फौजदारी दंड प्रक्रियासंहिता अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियुक्त करुन फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ विशेष अधिकार प्रदान केलेले आहेत. त्याअर्थी, संजय मीणा, जिल्हादंडाधिकारी गडचिरोली फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम
१४४ प्रमाणे प्राप्त झालेल्या अधिकाराच्या आदेशन्वये संपूर्ण गडचिरोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये Non-Conventional Aerial Objects,Drones, remote controlled or remotely piloted aircrafts, aircraft systems, para-gliders, aero-models, parachute उडविण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. तसेच सदर हद्दीत ५ किंवा ५ पेक्षा जास्त व्यक्तीला एकत्रित होण्यासाठी प्रतिबंधित करण्यात येत आहे. कोणत्याही व्यक्तीने किंवा कार्यक्रमाचे अयोजकांनी संपूर्ण गडचिरोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आकाशात Non-Conventional Aerial Objects, Drones, remote controlled or remotely piloted aircrafts, aircraft systems, para-gliders, aero-models, parachute उडवू नये. त्याकालावधीत जर शासकीय यंत्रणांना मा. महामहीम राष्ट्रपती, भारत सरकार यांचे गडचिरोली दौरा कार्यक्रमाचे
अनुषंगाने तथा सुरक्षेच्या कारणास्तव ड्रोन शुटींग ची आवश्यकता असेल आणि त्यांनी तशी परवानगी मागितली तर
त्यांना विहीत शर्ती व अटींना अधीन ठेवून परवानगी देण्यात येईल. सदरचा आदेश ०४/०७/२०२३ चे ००.०१ ते
दिनांक ०५/०७/२०२३ चे १८.०० वा.पर्यंत अंमलात राहील. दर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ कायदयान्वये शिक्षेस पात्र राहील. सदरचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली संजय मीणा यांनी कळविले आहे.