भुधारकांनी तात्काळ मोबदला घ्यावा
भंडारा, दि. 3 : भूसंपादन/ उपविभागीय अधिकारी यांच्याकडे भूसंपादन निवाडा प्रकरणात संयुक्त, आपसी वाद, मय्यत असलेली शेतकरी खातेदाराची मोबदला वाटप रक्कम शिल्कक आहे. त्यासंबंधाने भूसंपादन अधिकाऱ्यांनी गावपातळीवर मंडळ अधिकारी, तलाठी, सरपंच यांच्यामार्फत संबंधीत शेतकरी खातेदारांची सभा घेवून तात्काळ भूसंपादन निवाडा प्रकरणात शिल्लक असलेली मोबदला वाटपाची रक्कम नियमानूसार वाटप करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.
तसेच जुन्या भुसंपादन कायद्यानुसार मोबदला लागू केला असेल तर मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयान्वये जुन्या कायद्यानुसार देवू केलेला मोबदला व शासन परिपत्रक 23 जून 2020 अन्वये नवीन कायद्यानुसार मोबदला देय लागु होत नाही. तरी अशा भुधारकांनी तात्काळ मोबदला उचल करण्याचे अनुषंगाने प्रशासनाला सहकार्य करावे, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जाहिर आवाहन करण्यात येत आहे.