इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या एकरकमी परतावा योजनेचा लाभ घ्यावा
भंडारा, दि. 3 : इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळातर्फे लाभार्थ्यांना दिलेल्या कर्ज प्रकरणात संपूर्ण कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांना थकीत व्याज रकमेत 50% सवलत देण्याबाबतची एकरक्कमी परतावा योजना दिनांक 31 मार्च 2024 पर्यत राबविण्यात येत आहे. त्यानुसार, महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थींनी योजनेचा लाभ घेवून कर्ज मुक्त व्हावे, असे आवाहन इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्री. अस्वार यांनी केले आहे.