12 जुलै पर्यंत भंडारा जिल्ह्यात 37 कलम लागू

12 जुलै पर्यंत भंडारा जिल्ह्यात 37 कलम लागू

 

भंडारा, दि. 30 : बकरी ईद, आषाढी एकादशी, गुरूपोर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने उत्सव निमित्त काही ठिकाणी मिरवणूक तर काही ठिकाणी महाप्रसादाकरिता गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच एस.एस.सी व एच.एच.सी परीक्षेचा निकाल लागलेला असून पदविधर शिक्षणाकरिता विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या कॉलेजमध्ये प्रवेशाकरिता चढाओढ लागणार आहे. तसेच पावसाळा नक्षत्र सुरू होणार असल्याने शेतकरी आपल्या शेतीच्या कामाला लागलेला आहे.

 

पावसाळी हंगामाकरिता शेतकऱ्यांनी बि-बियाणे, खते, रासायनिक औषधी स्वस्त दरात उपलब्ध करुन द्यावेत व त्याचा नियमित पुरवठा करावा, पुर्नवसन, वाढती महागाई, बेरोजगारी तसेच विविध मागण्यांना घेऊन धरणे, मोर्चे, आंदोलने, निदर्शने आयोजित करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने 28 जून 2023 ते 12 जुलै 2023 पर्यंत 1951 च्या मुंबई पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) (3) चे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी लिना फलके यांनी लागू केले आहे. सदर अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर फौजदारी नियमाअंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.