विदर्भातील पहिला बल्लारपुर ओडीएफ़ प्लस तालुका घोषीत
चंद्रपुर – 28/06/2023 स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)टप्पा 2 अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे चालु असुन .यामध्ये बल्लारपुर तालुक्यातील गावे ओडीएफ़ प्लस च्या मानकांमध्ये बसत असल्यामुळे नुकताच बल्लारपुर तालुका उदयमान या घटकात ओडीएफ़ प्लस करण्यात आला असुन, बल्लारपुर तालुकाला विदर्भातील पहिला ओडीएफ़ प्लस तालुका ठरला आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)टप्पा 2 मध्ये ओडीएफ़ प्लस करतांना उदिमान, उज्वल व उत्कृष्ट या तीन घटकामध्ये घोषीत केल्या जात असुन, बल्लारपुर तालुक्यात 17 ग्रामपंचायती असुन, 26 गावे या तालुक्यामध्ये आहेत. यापैकी 10 गावे उत्कृष्ट या घटकातुन ओडीएफ़ प्लस म्हणुन घोषीत करण्यात आली तर, 16 गावे उदिमान या घटकातुन ओडीएफ़ प्लस म्हणुन घोषीत करण्यात आली. त्यानुसार बल्लारपुर पंचायत समीतीचे गटविकास अधिकारी अनिरुध्द वाळके यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रका द्वारे बल्लारपुर तालुका उदयमान या घटकात ओडीएफ़ प्लस झाल्याचे जाहीर केले आहे. या अगोदर सन 2016 मध्ये बल्लारपुर तालुका हा विदर्भातील पहिला हागणदारीमुक्त तालुका होण्याचा मान मिळाला होता. तीच परपंरा बल्लारपुर तालुक्यानी कायम ठेवली आहे.
चंद्रपुर जिल्ह्यातील बल्लारपुर तालुका विदर्भातील पहीला ओडीएफ़ प्लस तालुका झाला असुन, जिल्ह्या करीता अभिमानाची बाब आहे. अशाच पध्दतीने जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन टप्पा – 2 अंतर्गत भरीव कामे करुन चंद्रपुर जिल्हा ओडीएफ़ प्लस करण्यासाठी प्रयत्न करावे.
– नुतन सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी,पाणी व स्वच्छता.