सुंगंधीत तंबाखु वाहतुक करणारी टोळी पोलीसांचे ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

सुंगंधीत तंबाखु वाहतुक करणारी टोळी पोलीसांचे ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

 

थोडक्यात हकीकत :-

 

दिनांक २६ जुन २०२३ रोजी जागतीक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमीत्ताने भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. लोहीत मतानी सा. यांनी स्थानिक गुन्हे शाखा भंडारा येथील पोलीस निरीक्षक श्री. नितीन चिंचोळकर यांना अंमली पदार्थाची खरेदि, विक्री, सेवन तसेच वाहतुक करणाऱ्या इसमांवर प्रभावी कारवाई करण्याचे आदेशित केले होते.

 

त्याअनुषंगाने श्री. नितीन चिंचोळकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांनी गुन्हे शाखेतील सहा. पोलीस निरीक्षक श्री. नारायण तुरकुंडे यांचेसह, पोहवा रोशन गजभिये, तुळशिदास मोहरकर, विजय राउत, पोना प्रफुल कठाणे, श्रीकांत मस्के यांचे ०१ पथक तयार करून सदर पथकास जागतीक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमीत्त अंमली पदार्थबाबत प्रभावी कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यावरून सदर पथक हे जिल्हा हद्दीत अंमली पदार्थाची खरेदि, विक्री, वाहतुक करणाऱ्या ईसमांबाबत माहीती घेत असताना पथकास गोपनीय बातमीदाराकडुन विश्वसनीय माहीती मिळाली की, लाखांदूर येथील नामे मोहन नागवानी हा एका पांढऱ्या रंगाच्या महीन्द्रा कंपनीच्या डाला गाडी क्र. एम एच ३६ ए ए ०५५४ मधे प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु छत्तीसगड राज्यातुन लाखांदुर येथे आणत आहे. प्राप्त माहीतीवरुन पथकाने वेळीच चिचगाव फाटयावर नाकेबंदि केली असता बातमीदाराने दिलेल्या माहीतीप्रमाणे सुगंधीत तंबाखुची वाहतुक करणारी पांढऱ्या रंगाची महीन्द्रा कंपनीची डाला गाडी क्र. एम एच ३६ ए. ए ०५५४ मिळून आली. सदर वाहनाची तपासणी केली त्यात वरीलप्रमाणे २४,६५,०८०/- रु ची प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु मिळून आल्याने सुगंधीत तंबाखु व वाहन असा एकूण ३५,६५,०८० /- रु चा मुद्देमाल ताब्यात घेवुन नमुद आरोपीतांविरुद्ध अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती शितल सुधाकर देशपांडे अन्न व औषध प्रशासन भंडारा यांचे तक्रारीवरून पो.स्टे. लाखांदूर येथे अप.क्र. २०७ / २०२३ कलम १८८, २७२, २७३, २७८, ३४ भादंवि सहकलम ५९ अन्न व सुरक्षा मानके २००६ अन्वये नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे, स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा हे करीत आहेत.

 

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. लोहीत मतानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा भंडारा येथील पोलीस निरीक्षक श्री. नितीन चिंचोळकर, सहा. पोलीस निरीक्षक श्री. नारायण तुरकुंडे, पोहवा रोशन गजभिये, तुळशिदास मोहरकर, विजय राउत, पोना प्रफुल कठाणे, श्रीकांत मस्के यांनी केलेली आहे.