अहिल्यादेवी बालगृह घोट येथील बालकांकरिता जिल्हा स्तरावर
एक दिवसीय अभ्यास सहलचे आयोजन एक अभिनव उपक्रम ”
जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय व बाल कल्याण समितीचा पुढाकार
गडचिरोली, दि.26: दिनांक 23 जून 2023 ला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली अंतर्गत कार्यरत अहिल्यादेवी मुलींचे बालगृह घोट येथील बालकांसाठी जिल्हा स्तरावर एक दिवसीय अभ्यास सहलचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा न्यायालय, व पोलीस अधीक्षक कार्यालय इत्यादी शासकीय कार्यालयात भेट देऊन तेथील कार्यालय प्रमुखाशी चर्चा करून वेगवेगळ्या विषयांबाबत बालकांनी माहिती जाणून घेतली व जिल्हास्तरावर कार्यालयीन कामकाज कसे चालतात व समोर जाऊन प्रशासकीय क्षेत्रात अधिकारी बनण्यासाठी कशा प्रकारे परिश्रम घ्यावं लागेल आणि त्याकरिता कुठला अभ्यासक्रम करावा लागतो याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेतली.
सर्वप्रथम जिल्हाधिकारी यांचे सहमतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे भेट दिले. मोहन टिकले तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची भूमिका व विविध विभागांच्या कामकाजाविषयी प्रत्यक्ष माहिती दिली. धनाजी पाटील अप्पर जिल्हाधिकारी, ओंकार पवार, जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली, दर्शन निकाळजे निवासी उपजिल्हाधिकारी, यांनी मुलींना यथोचित मार्गदर्शन केले.
त्यानंतर जिल्हा परिषद, गडचिरोली येथे भेट दिले. राजेंद्र माधवराव भुयार अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, शेखर शेलार, उप मुकाअ (सामान्य प्रशासन)व फरेंद्र रुपचंद्र कुतिकर, उप मुकाअ (स्वछता व पाणीपुरवठा) यांनी जिल्हा परिषद विभागाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली.
त्यानंतर जिल्हा न्यायालय गडचिरोली येथे उदय शुक्ल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश यांचे सोबत बालकांनी मनसोक्त चर्चा केल्या यात न्यायधीश साहेबानी प्रत्येक बालकाला व्यक्तिशः पुढे काय बनायचे आहे याबाबत त्यांचे मत जाणून घेवून वैयक्तिक मार्गदर्शन केले व स्वानुभवातून त्याकरिता त्यांना कशा प्रकारे परिश्रम घ्यावं लागेल याविषयीचे मार्गदर्शन केले.
त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालय येथे भेट दिले असता श्री. निलोत्पल, पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांनी IPS बनण्याकरिता कशी तयारी करावी व कुठले अभासक्रम आवश्यक आहे याबाबत बालकांना माहिती दिली व बालकांनी वेगवेगळ्या विभागाची माहिती करून घेतली.
बाल कल्याण समिती दर महिन्याला बालगृहाला भेट देऊन बालकांच्या अडचणी समजून घेत असते त्यात बालिका वेळोवेळी सहलीला येण्याची विनंती करीत होत्या तेव्हा त्यांना इतर ठिकाणी सहलीला नेण्यापेक्षा त्यांच्यात आत्मविश्वास जागृत करण्यासाठी व पुढील भविष्य उज्ज्वल करण्यासाठी त्यांना चालना मिळावी म्हणून बाल कल्याण समितीच्या पुढाकाराने व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या सहकार्याने अभ्यास दौ-याचे आयोजन करण्यात आले.
यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर, बाल कल्याण समातीचे अध्यक्ष वर्षा मनवर, सदस्य दिनेश बोरकुटे, काशिनाथ देवगडे, जिल्हा बाल संरक्षण अधीकारी अविनाश गुरनुले, तसेच अहिल्यादेवी बालगृहाच्या अधिक्षिका निर्मला टोपो, जयंत जथाडे सामाजिक कार्यकर्ता, तनोज ढवगाये, उज्वला नाकाडे, पूजा धमाले, प्रियंका आसुटकर उपस्थित होते. प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचारी वर्गानी मोलाचे सहकार्य केले.