मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती ईआर-1 मध्ये सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत

मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती ईआर-1 मध्ये सादर

करण्याची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत

 

चंद्रपूर, दि. 23 : चंद्रपूर जिल्हयातील सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांनी त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष/स्त्री व एकूण अशी सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीस भरणे आवश्यक आहे. विहीत नमुना ईआर-1 मध्ये नियमितपणे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahawayam.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सदर माहिती सादर करणे बंधनकारक असून अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत आहे.

 

जुन 2023 अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ईआर-1 मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय भवन,पहिला माळा, हॉल क्र. 5/6, चंद्रपूर या कार्यालयाद्वारे ऑनलॉइन पध्दतीने दि. 1 जुलै 2023 पासून सुरु होत आहे. तरी, जिल्हयातील सर्व आस्थापनांना या कार्यालयाकडून यापूर्वीच युझरनेम व पासवर्ड देण्यात आलेले आहेतच. ज्यांना प्राप्त झाले नाही त्या आस्थापनांनी प्राप्त करुन घ्यावा. युझरनेम व पासवर्डचा वापर करुन प्रत्येकाने या विभागाच्या www.rojgar.mahawayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगीन करुन आपली अचूक माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी.

 

सदरील जुन 2023 अखेरचे तिमाही विवरणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. याची सर्व आस्थापनांनी नोंद घ्यावी. हे तिमाही‍ विवरण विहीत मुदतीत ऑनलाईन पध्दतीने सादर करावे. तद्वतच प्रत्येक आस्थापनेने आपला नोंदणी तपशील (Employer Profile) देखील आवश्यक ती सर्व माहिती नोंदवून तात्काळ अद्यावत करावी. यासंदर्भात कोणत्याही स्वरुपाचे सहकार्य अथवा माहिती आवश्यक असल्यास ई-मेल आयडी chandrapurrojgar@gmail.com किंवा asstdiremp.chandrapur@ese.maharashtra.gov.in यावर तसेच 07172-252295 दुरध्वनी क्रमांकावर आपला उद्योजक नोंदणी क्रमांक व इतर सर्व आवश्यक तपशीलासह संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.