जिल्हा न्यायालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
भंडारा, दि. 21 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व कौटूंबिक न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोजी जिल्हा न्यायालय येथील परिसरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण राजेश गो. अस्मर तर प्रमुख पाहूणे न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय पी. एल. पालसिंगणकर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून योगतज्ञ डॉ. रेणुका तिवारी व श्रीमती दुर्गा शर्मा उपस्थित होत्या.
याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून योगतज्ञ डॉ. रेणुका तिवारी यांनी नियमित योग करून आपण आपले शारीरिक मानसिक आणि बौद्धिक आरोग्य उत्तम ठेवू शकतो. नियमित योग केल्याने आपले शरीर निर्विकार बनते. मन शुद्ध होते. नकारात्मक ऊर्जा जाऊन विचारांमध्ये सकारात्मकता येते, म्हणून आपण योग करावा असे सांगितले. यावेळी योगतज्ञ श्रीमती दुर्गा शर्मा यांनी प्राणायाम, कपालभाती, अनुलोम-विलोम, भ्रामरी प्राणायम, भूजंगासन, शवासन, त्रिकोणासन असे विविध योगासने प्रात्याक्षिक करुन दाखविले.