अप्पर जिल्हाधिकारी चिमूर करीता सिन्देवाही करांचा विरोध
अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाकरीता मध्यवर्ती स्थळाची निवड कां नाही ?
सिन्देवाहीकरांचा संतप्त सवाल
चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होणे ही अत्यंन्त महत्वाची बाब आहे.कारण ज्यावेळेस चंद्रपूरचे विभाजन होऊन गडचीरोली जिल्हा निर्मान झाला त्यावेळेस सुद्धा सिन्देवाही बाबत सकारात्मक अहवाल पाठवीण्यात आला होता . परंतू वैनगंगेला हद्द ठरवून विभाजण केल्यामुळे सिन्देवाही हा तालुकाच राहीला.जिल्ह्याचे विभाजण करतांना नवनिर्मीत जिल्ह्याचे ठीकाण हे जवळपास समावीष्ट क्षेत्राचे मध्य ठिकाण असावे . दळण-वळणाची साधने रेल्वे,प्रमुखमार्ग असावेत. पूरेशी जागा असावी , विभाजण संयुक्तीक असावे व जिल्हानिर्मीती प्रक्रीया ही कायमस्वरुपी असल्यामुळे प्रशासकीय, भौगोलीक, आर्थीक व वेळेच्या बचतीच्या द्रूष्टीने सर्वसामान्य नागरीक शासन व प्रशासनाला परवडणारी असावी. ह्या द्रूष्टीकोनातून विभाजण होणे महत्वाचे आहे .मा. जिल्हाधिकारी यांचे पत्र क्र.222/20 दिं. 29/1/2021 नुसार मागणी केलेल्या आक्षेपास अनुसरुण सिन्देवाही तालुक्यातील हजारो नागरीकांनी सामुहीक / वैयक्तीक स्वरुपात आक्षेप ऊपविभागीय अधीकारी कार्यालय चिमुर येथे माहे फरवरी 2021 मद्धे नोंदवीले . त्यावर आजपर्यन्त कोणताही निपटारा/सुणावणी न करताच दिं. 13/6/2023 रोजी मंत्रीमंडळात घेतलेला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय कार्यान्वीत करण्याचा निर्णय हा जणहीत विरोधी असून भावनीक व राजकिय द्रूष्ट्या प्रेरीत आहे.
कारण चंद्रपूर जिल्हा हा 15 तालुके मीळूणबनलेला आहे तेव्हा विभाजन म्हटले तर 8-7, 9-6 ह्या प्रमाणात होणे न्यायोचीत आहे. परंतु तसे न करता ते 11-4 ह्या प्रमाणात करुण चुक केलेली आहे. लोकसंखेच्या बाबतीत सुद्धा 2011 च्या जनगनणने नुसार चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्या 22,04,304 आहे ठोकळ माणाने विभाजण केल्यास मूळ जिल्हा सरस समजूण 12,04,304 व नवीण जिल्ह्याची 10,00,000 लोकसंख्या असावयास पाहीजे अहमदनगर जिल्ह्याच्या तूलनेत.
परंतू तसे न करता चंद्रपूरचे बाबतीत मुळ जिल्हा 16,25,135 व अप्पर जिल्हा 5,79,169 लोकसंख्या असे विभाजण करुन फार मोठा अन्याय केलेला आहे .सिन्देवाही करांची मागणी ही सुद्धा फार जुणीच असून ह्यापूर्वी नकाशा , अंतर व सुविधेबाबत सविस्तर शासण , प्रशासणास कळवीले आहे , तेव्हा निवेदनासोबत जोडलेल्या नकाशा चा जिल्हा / अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय निर्मीतीच्या संबंधाणे सकारात्मक विचार करावा अन्यत: नाईलाजास्तव संविधानीक मार्गाने लढा लढावा लागेल असा ईशारा सिन्देवाही जिल्हा निर्मीती क्रूती समितीच्या वतीने देण्यात आला त्यावेळेस प्रामुख्याने सर्वश्री मनोहर पवार, जयदेव श्रीरामे , रामटेके सर, भालतडक सर, विद्या धुळेवार, वंदना गजभीये, मेंढूळकर मँडम, हिरालाल ईंदोरकर, पंकज कंकलवार, परसराम सलामे, विलास गंडाटे, लोणबले, कोकोडे, व ईतर बहुसंख्य नागरीक उपस्थीत होते.