फसव्या जाहिरातींपासून सावध रहा जिल्हा शल्य चिकीत्सकांचे आवाहन
भंडारा, दि. 16 : शासकीय रूग्णालयात जिल्हा सुरक्षा रक्षक भरती अशा प्रकारची जाहिरात समाज माध्यमांवर फिरत आहे. सदर जाहिरात बेरोजगार व सुशिक्षीत युवकांची दिशाभुल करणारी आहे. जिल्हा रूग्णालयात शासनाने नेमुन दिलेल्या Mesco Mumbai यांच्याद्वारे नियुक्त सुरक्षा रक्षक कार्यरत आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा फसव्या जाहिरातींपासून सावधानता बाळगावी, असे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.