भंडारा येथे 19 जून रोजी महिला लोकशाही दिन

भंडारा येथे 19 जून रोजी महिला लोकशाही दिन

 

भंडारा, दि. 16 : पीडित महिलांना त्यांचे प्रश्न व समस्या मांडण्यासाठी तसेच महिलांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा. यादृष्टीने प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्याअनुषंगाने 19 जून 2023 रोजी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे दुपारी 1 वाजता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येणार आहे. या लोकशाही दिनामध्ये महिलांच्या तक्रारी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत स्वीकरण्यात येणार आहे.

महिला लोकशाही दिनात तक्रार दाखल करण्यासाठी तक्रार अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, शिवाजी क्रीडा संकूल, बसस्टॉप जवळ, भुविकास बँक, भंडारा येथे उपलब्ध आहे. जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात तक्रार अर्ज सादर करतांना जिल्हाधिकारी यांना उद्देशून अर्ज, तालुका महिला लोकशाही दिन टोकन क्रमांक असल्यास प्रत जोडावी. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, सेवा विषयक, आस्थापना विषयक व निवेदन स्वरुपाच्या तक्रारी स्वीकारण्यात येणार नाही, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत कळविले आहे.