अनाधिकृत एच टी बी टी बियाणे खरेदी करू नये – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

अनाधिकृत एच टी बी टी बियाणे खरेदी करू नये – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांचे आवाहन

 

गडचिरोली, दि.16: शेतकऱ्यांनी खरीप हंगामात लागवडीसाठी एचटीबीटी (चोर बीटी) बियाणे खरेदी करू नये असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.बसवराज मास्तोळी यांनी केले आहे,जिल्ह्यातील सध्या बाजारात बोगस बियाणे खाजगी व्यक्ती मार्फत छुप्या मार्गाने पुरवठा होण्याची शक्यता आहे,या अवैध बियाण्यांना शासनाची कोणतीही मान्यता नाही,अश्या प्रकारचे बियाणे विक्री करणे ,बाळगणे ,साठा करणे गुन्हा आहे,या प्रकारचे लागवड केलेल्या कापूस पिकाची पाने व कापसाचे नमुने तपसणी करण्याचे तंत्रज्ञान अवगत झाले आहे,,यात एच टी बीटी आढळून आल्यास संबंधितावर कार्यवही करण्यात येणार आहे, सदर एचटीबीटी लागवड केल्याने जामिनाचा ऱ्हास होऊन जमिनी कालंतराने नापीक होतात,मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होतो,तरी शेतकर्याने अधिकृत कापूस बियाणे लागवड करावे, एखाद्या व्यक्तीकडे अनाध्रीकृत एच टी बियाणे आढळून आल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्यात येईल एचटीबीटी बियाणे विक्री करणाऱ्या लोकांवर कृषी विभाग लक्ष ठेवून असून आम्ही टीम ACTIVE केली असून आष्टी परिसर व आजूबाजूच्या परिसरात स्वत; लक्ष देऊन आहोत ,संशायीत ठिकाणच्या झडती घेणे सुरु आहे,शक्य तिथे पोलीस विभागाची मदत घेतली जात आहे असे संजय मेश्राम जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक गडचिरोली यानी कडविले आहे.