तीन तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम
भंडारा, दि. 13 : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील तुमसर, भंडारा, पवनी या तीन तालुक्यातील 8 ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानुसार नव्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
विशेष ग्रामसभेची सुचना देणे (आरक्षण सोडत काढण्याकरिता) दि.16 जून विशेष ग्रामसभा बोलवुन तहसिलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील, आरक्षणची सोडत काढणे (अनु.जाती महिला, अनु. जमाती महिला, नामाप्र, सर्वसाधारण महिला) दि.21 जून सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द करणे दि.22 जून प्रभागनिहाय आरक्षण निश्चीतीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी 23 जून ते 30 जून 2023 उपविभागीय अधिकारी यांचे अभिप्राय विचारात घेउून अंतिम अधिसुचनेस नमुना जिल्हाधिकारी यांची मान्यता देणे 12 जुलै 2023 जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतीम प्रभाग रचनेला नमुना अ व्यापक प्रसिध्दी देणे 14 जुलै 2023 तरी संबंधित तहसीलदारांनी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राबवून वेळोवेळी त्याचा अहवाल देण्याचे उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांनी कळवले आहे.