हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशाला 23 जून पर्यंत मुदतवाढ

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशाला 23 जून पर्यंत मुदतवाढ

 

भंडारा, दि. 13: ओडिशा राज्यातील बरगढ येथे स्थित भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेच्या पदवीका अभ्यासक्रमाकरिता राज्यातून 13 जागा तर आर्थिक दुर्बल घटकासाठी 1 जागा तसेच वेंकटगिरी येथील कॅम्पस करिता 2 जागांच्या प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले होते. सदर प्रवेश अर्ज सादर करण्याकरिता 23 जून 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगीक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या http.www.dirtexmah.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विदर्भातील 11 जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यानी प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, प्रशासकीय इमारत क्रं. 2, 8 वा माळा, बि विंग, सिव्हील लाईन, नागपूर यांचेकडून प्राप्त करुन घ्यावा. कार्यालयाच्या 0712-2537927 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधुन अधिक माहिती घेता येईल. अर्जाचा नमुना व विहीत पात्रता कार्यालयाचे नोटीस बोर्डावर लावण्यात आलेली आहे. असे वस्त्रोद्योग विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त सीमा पांडे यांनी कळवले आहे.