कोतवाल भरती प्रक्रियेतील गैरप्रकारात निमेश गेडाम यांचा कोणताही संबंध नाही

कोतवाल भरती प्रक्रियेतील गैरप्रकारात निमेश गेडाम यांचा कोणताही संबंध नाही

 

भंडारा, दि. 9 : भंडारा तालुक्यातील कोतवाल भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याबाबत दिनांक 8 जून 2023 रोजी विविध वृत्तपत्रामध्ये लिपीकाच्या मोबाईलवर उत्तराचा स्क्रिनशॉट असे वृत्त प्रकाशित झाले. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक निमेश गेडाम यांचे नावही प्रकाशित करण्यात आले. कोतवाल भरती प्रक्रियेतील गैरप्रकारात निमेश गेडाम, लिपिक यांचा कोणताही संबंध नाही, उलटपक्षी त्यांचे सतर्कतेमुळे सदर प्रकार उघडकीस आला आहे, असे भंडारा तहसीलदार तथा सदस्य सचिव कोतवाल भरती-2023 यांनी कळविले आहे.