राज्यात माविम भंडारा तृतीय पारितोषिकाने सन्मानित
भंडारा, दि. 8 : महिला आर्थिक विकास महामंडळ, भंडारा जिल्हा महाराष्ट्र राज्यात तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पांतर्गत माविम भंडारा जिल्हा कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यात बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या विकासाकरिता विविध योजनांची अंमलबजावणी करणे, त्यांचा सर्वांगीण विकास करणे. जिल्ह्यात विविध प्रकल्पांच्या माध्यमातून महिलांसाठी स्वयंरोजगार व त्यातून त्यांच्या आर्थिक विकासाकरिता कार्य करीत आहे.
भंडारा जिल्ह्यात सबप्रोजेक्ट संकल्पना मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली, हे विशेष. याकरिताच महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबईद्वारे दि. 5 ते 7 जून या कालावधीत सुरू असलेल्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत माविमच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. इंदू जाखड, (भाप्रसे) यांनी महाराष्ट्रात केवळ भंडारा जिल्ह्याने सर्वाधिक सब प्रोजेक्ट राबविले असून राज्यात सर्वोत्कृष्ट कामगिरीबाबत माविम भंडारा जिल्हा कार्यालयाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन कौतुक केले. यात माविम, भंडाराचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे, सहायक जिल्हा समन्वय अधिकारी मोहन घनोटे, लेखाधिकारी मुकुंद देशकर यांनी पारितोषिक स्वीकारले.