पंतप्रधान राष्ट्रीय अप्रेंटिसशिप मेळावाचे 12 जुन रोजी आयोजन
चंद्रपूर, दि. 08 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र व नॅशनल करीअर सर्विसेस, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 12 जुन 2023 रोजी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, चंद्रपूर येथील कौशल्य बलम् सभागृहात सकाळी 10 वाजता पंतप्रधान राष्ट्रीय अप्रेंटिसशिप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर मेळाव्यामध्ये अशोक लेलॅंड, फायब्रोटफ, लक्ष्मी अग्नी पुणे, जय महाराष्ट्र करीअर सर्विसेस, आदी कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. या मेळाव्यात शिकाऊ उमेदवारांची (ट्रेनी) निवड करण्यात येणार आहे. सदर मेळाव्यामधून 10वी, 12वी, आयटीआय मुख्यता टर्नर, फिटर,मशिनिस्ट, ग्रांइडर, सिएनसी-व्हीएमसी ऑपरेटर, एमसीव्हीसी-सिएमसी-व्हीएमसी कोर्स, बीपीएल कोर्स कमवा व शिका, कारपेंटर, डिझेल मेकॅनिक, मोटार मेकॅनिक आदी कोर्सच्या उमेदवारांकरीता रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
उमेदवारांनी मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरीता
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdJ53x4kQX7zAcXfgq7cCzkF51dn7kIn2bmxX7VesccF0gZQ/viewform?usp=sflink किंवा ncs.gov.in आणि www.rojgar.mahaswayam.gov.in. लिंक / पोर्टलचा उपयोग करून नोंदणी करावी.
या अप्रेंटिसशिप मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी होवुन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रविद्र मेंहेदळे यांनी केले आहे.